वृत्तसंस्था/पॅरिस
2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पुरूषांच्या 200 मीटर धावण्याच्या शर्यतीत बोट्सवानाच्या लेत्साईल टेबोगोने 19.46 सेकंदाचा अवधी घेत नव्या आफ्रिकन विक्रमासह सुवर्णपदक मिळविले.
टेबोगोने या क्रीडा प्रकारात दर्जेदार कामगिरी करताना नोव्हा लायल्सला मागे टाकले. गेल्या रविवारी लायल्सने पुरूषांच्या 100 मी. धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळविले होते. मात्र शुक्रवारी 200 मीटर धावण्याच्या शर्यतीत अमेरिकेच्या केनीथ बेडनिरेकला टेबोगोने मागे टाकले. अमेरिकेच्या बेडनिरेकने 19.62 सेकंदाचा अवधी घेत कास्य पदकासह तिसरे स्थान घेतले. बोट्सवानाच्या टेबोगोने ऑलिम्पिक सुवर्णपदक आईला समर्पण केले आहे. गेल्या वर्षी झालेल्या विश्व चॅम्पियनशीप अॅथलेटिक्स स्पर्धेत टेबोगोने पुरूषांच्या 200 मी. धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदक पटकाविले होते.









