▪️ ऑल एस आर पी एफ मधून झालेल्या बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेत यश
Gold medal to Rohan Kerkar, son of Adarshgaon Ker
देशसेवा बजावणारे सैनिक दोडामार्ग तालुक्यातील आदर्श गाव केरचे सुपुत्र रोहन केरकर यानी बॉक्सिंग क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक प्राप्त केले असून केर गावासह पंचक्रोशीतुन अभिनंदन होत आहे.
नुकतीच दौड येथे ऑल एस आर पी एफ मधून झालेल्या बॉक्सिंग क्रीडा स्पर्धा पार पडली. यामध्ये रोहन केरकर यांना सुवर्णपदक प्राप्त झाले. त्याला एस आर पी एफ चे चीफ ऍडीशनल डीजी चिरंजीव प्रसाद आयपीएस यांच्या हस्ते सुवर्णपदक प्रदान करून गौरविण्यात आले.
दोडामार्ग – प्रतिनिधी









