वृत्तसंस्था / चंडीगड
अबुधाबीमध्ये नुकत्याच झालेल्या आशियाई शालेय मुष्टीयुद्ध चॅम्पियनशीप स्पर्धेत भारताची महिला मुष्टीयोद्धी गुरुसिरत कौरने सुवर्णपदक पटकाविले.
गुरुसिरत कौरला बालपणापासूनच मुष्टीयुद्ध क्षेत्राची आवड असल्याने पालकांनी तिला अधिक प्रोत्साहन दिले. गुरुसिरत कौरने सुवर्णपदकाच्या लढतीत कजाकस्तानच्या स्पर्धकाचा 5-0 असा एकतर्फी पराभव केला. आता गुरुसिरत राष्ट्रकुल व ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अधिक उत्सुक आहे.









