वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
येथे सुरु असलेल्या अखिल भारतीय मानव रचना खुल्या शॉटगन नेमबाजी स्पर्धेत भारताचा नेमबाज फाहद सुलतानने सुवर्णपदक पटकाविताना आपले नजिकचे प्रतिस्पर्धी प्रभातकुमार आणि त्यागी यांना मागे टाकले.
भारताचा ऑलिम्पिक नेमबाजपटू अन्वर सुलतान यांचा फाहद मुलगा आहे. त्याने कुएतमध्ये झालेल्या नेमबाजी स्पर्धेत आपला सहभाग दर्शविला होता. पुरूषांच्या खुल्या शॉटगन नेमबाजी स्पर्धेत फाहदने 50 पैकी 42 शॉट अचूक नोंदवित सुवर्णपदक पटकाविले. प्रभातकुमारने 37 शॉट्ससह रौप्यपदक तर त्यागीने 31 शॉट्ससह कांस्यपदक घेतले. महिलांच्या विभागात आद्या त्रिपाठी, भावना चौधरी आणि कथा कपूर यांनी अंतिम फेरीत स्थान मिळविले आहे.









