वृत्तसंस्था/ टॅम्पेरे (फिनलँड)
येथे सुरू असलेल्या वयस्करांसाठीच्या विश्व मास्टर्स ऍथलेटिक्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारी 94 वर्षीय महिला धावपटू भगवानी देवी यांनी महिलांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक पटकाविले. या स्पर्धेमध्ये भगवानी देवी यांनी दोन पदकांची कमाई केली.
महिलांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत भगवानी देवी यांनी 24.74 सेकंदाचा अवधी घेत सुवर्णपदक पटकाविले. या स्पर्धेत भगवानी देवी यांनी महिलांच्या गोळाफेक या क्रीडाप्रकारात कास्यपदकही मिळविले आहे. ही स्पर्धा 29 जून ते 10 जुलैपर्यंत झाली. 35 वर्षांवरील पुरुष आणि महिलांसाठी ही स्पर्धा घेण्यात आली.









