वार्ताहर/सांबरा
बेंगळूर येथे अखिल भारतीय हवाईदल कॅम्पमध्ये सप्टेंबरात घेण्यात आलेल्या स्कीट नेमबाजी स्पर्धेमध्ये मुतग्याची कन्या तसेच जीएसएस कॉलेजची विद्यार्थिनी त्रिशा पाटीलने सुवर्णपदक पटकविले. या स्पर्धेमध्ये विविध राज्यातील एकूण 17 स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यामध्ये त्रिशा पाटीलने प्रथम क्रमांक घेत घवघवीत यश संपादन केले. या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत असून तिला प्रशिक्षक आदींचे मार्गदर्शन लाभले आहे. मुतगे येथील श्री भावकेश्वरी स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रमुख व माजी सैनिक बाळकृष्ण पाटील यांची ती कन्या होय.









