आकाश एम. सामनावीर व मालिकावीर
बेळगाव : कर्नाटक राज्य टॅक्स प्रॅक्टिशनर्स संघटना आयोजित सुवर्ण केएसटीपीए होंबळ चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धारवाड अ संघाने तुमकूर संघाचा 9 गड्यांनी पराभव करून सुवर्ण केएसटीपीए चषक पटकावला. आकाश एम. याला सामनावीर व मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. य् ाgनियन जिमखाना मैदानावरती पहिल्या एलिमिनेटर सामन्यात धारवाड ब ने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 6 गडी बाद 56 धावा केल्या. त्यात मानेने 2 चौकारांसह 21 तर श्रीकांतने 11 धावा केल्या. तुमकूरतर्फे हर्षने 13 धावात 3 तर तेजसने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना तुमकूर संघाने 5.4 षटकात 2 गडी बाद 57 धावा करून सामना 8 गड्यांनी जिंकला. त्यात तेजसने 20 तर श्रीनिवासने 16 धावा केल्या. धारवाड ब तर्फे माने व शशांक यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. दुपारी खेळविण्यात आलेल्या अंतिम सामन्यात तुमकूर संघाने प्रथम फलंदाजी करताना 10 षटकात 4 गडी बाद 79 धावा केल्या. त्यात तेजसने 2 चौकारांसह 31 तर हर्षने 14 धावा केल्या. धारवाड अ तर्फे उदयने 16 धावात 2 तर कार्तिकने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना धारवाड अ संघाने 5.5 षटकात 1 गडी बाद 85 धावा करून सामना 9 गड्यांनी जिंकला. त्यात आकाश एम. ने 2 षटकार आणि 6 चौकारांसह 49 तर कार्तिकने 4 चौकारांसह 22 धावा केल्या. तुमकूरतर्फे शांतारामने 1 गडी बाद केला. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे सहआयुक्त वालकर, रमेश बाबू एम. जे., एस. नंजुडप्रसाद यांच्या हस्ते विजेत्या धारवाड अ व उपविजेत्या तुमकूर संघाला चषक, रोख रक्कम, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेसाठी पंच म्हणून सुजित शिंदोळकर व सोहम कुलकर्णी तर स्कोअरर म्हणून गौस हाजी, रोहित यांनी काम पाहिले.









