वृत्तसंस्था/ बाकू
आयएसएसएफच्या 2023 सालातील विश्व नेमबाजी चॅम्पियनशिप स्पर्धेत शुक्रवारी भारताच्या महिला नेमबाजानी 50 मी. पिस्तुल सांघिक नेमबाजी प्रकारात सुवर्णपदक पटकावले.
महिलांच्या 50 मी. पिस्तुल सांघिक नेमबाजीत भारताच्या तियाना, साक्षी सुर्यवंशी आणि किरनदीप कौर यांनी 1573-6एक्स गुण नोंदवत सुवर्णपदक पटकावले. या क्रीडा प्रकारात चीनने 1567-9एक्स गुण नोंदवत रौप्यपदक तर मंगोलियाने 1566-3एक्स गुण नोंदवत कास्यपदक पटकावले. पुरुषांच्या 50 मी. पिस्तुल सांघिक नेमबाजीत भारताला कास्यपदकावर समाधान मानावे लागले.या क्रीडा प्रकारात भारताच्या विक्रम शिंदे, कमलजित आणि रविंद्र सिंग यांनी 1646-28एक्स गुण नोंदवत कास्यपदक पटकावले. या क्रीडा प्रकारात चीनने 1655-32एक्स गुणासह सुवर्ण तर कोरिया प्रजासत्ताकने 1654-30एक्स गुणासह रौप्यपदक मिळवले. या स्पर्धेत भरताने आतापर्यंत 6 सुवर्ण आणि 8 कास्यपदकांसह एकूण 14 पदकांची कमाई केली आहे.









