वृत्तसंस्था/पॅरिस
2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत हंगेरीचा जलतरणपटू क्रिस्तॉफ रासोव्हस्कायने जलतरणच्या विविध क्रीडा प्रकारात आपले वर्चस्व ठेवल्यानंतर त्याने शुक्रवारी पुरूषांच्या 10 कि.मी. पल्ल्याच्या मॅरेथॉनचे सुवर्णपदक पटकाविले.
पुरूषांच्या 10 कि.मी. मॅरेथॉनमध्ये रासोव्हस्कायने 1 तास, 50 मिनिटे, 52.7 सेकंदाचा अवधी घेत सुवर्ण पदक पटकाविले. जर्मनीच्या क्लिमेटने रौप्य तर हंगेरीच्या बिटलहॅमने कास्य पदक मिळविले. पुरूषांच्या 10 कि.मी. मॅरेथॉन क्रीडा प्रकारात शेवटच्या टप्प्यातही क्लिमेंट आणि रासोव्हस्काय यांच्यात चुरस पहावयास मिळाली. पण रासोव्हस्कायने क्लिमेटला 2.1 सेकंदाने मागे टाकले.