डॉलरही पोहोचला ८७.३६
कोल्हापूर
केंद्रीय अर्थसंकल्पानंतर सोने व चांदीच्या दरात सतत वाढ सुरू झाली आहे. बुधवारी (५ फेब्रुवारी) सोने १० ग्रॅमसाठी ८७१०० तर चांदी किलोला ९८४०० रूपयावर पोचली आहे. एकीकडे अमेरिकन डॉलर व शेअर मार्केटच्या स्थितीत चढ-उतार सुरू आहे. पंधरा दिवसात सोने व चांदी दरात ५३०० रूपयाची वाढ झाली आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पानंतर सोने व चांदीच्या दरात सतत वाढ सुरू झाली आहे. तर डॉलर व शेअरमार्केटमध्ये कोणतीच स्थिरता नाही. केंद्रीय अर्थंसंकल्पामध्ये सोने -चांदीबाबत कोणताच निर्णंय झालेला नाही. गंळवारी सोने ८५७०० तर चांदी ९६७०० अशी झाली होती. तर बुधवारी एका दिवसात सोने १४०० तर चांदी १७०० रूपयांनी महागली. बुधवारी सोने ८७१०० तर चांदी ९८४०० असा दर होता.
दुसरीकडे मात्र सोने-चांदीच्या दरात वाढ सुरू आहे. सोमवारी डॉलरचा दर ८७.१७ असा असताना, मंगळवारी हाच दर ८७.०४ इतका झाला होता. डॉलरची किरकोळ घसरण सुरू असताना , बुधवारी डॉलरचा दर मात्र पुन्हा एकदा वाढला.बुधवारी डॉलरचा दर ८७.३६ असा झाला. रूपयाच्या तुलनेत डॉलरच्या दरात चढ-उतार सुरू असताना, चांदीच्या दराची वाटचाल लाखाकडे सुरू झाली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








