बेळगाव : शुक्रवारपेठ, टिळकवाडी येथील इस्कॉन मंदिरात श्री गोकुळाष्टमीनिमित्त गुरुवारपासून विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली. गुरुवारी सायंकाळी 5.30 ते 6.30 या वेळेत अभिषेक व पूजा-अर्चा झाली. 6.30 ते 7.15 पर्यंत गौराआरती व 7.15 ते 8.30 पर्यंत प. प. भक्ती रसामृत स्वामींचे प्रवचन झाले. यामध्ये त्यांनी सुश्राव्य माहिती दिली. रात्री प्रसादाचे वाटप करण्यात आले.
शुक्रवारी पहाटे 4.30 ते 9 पर्यंत मंगल आरती, जप, कृष्णकथा व सायंकाळी 6 ते 9 पर्यंत अभिषेक, नाटय़लिला व रात्री कृष्णकथा होणार आहे. त्यानंतर प. प. भक्तीरसामृत स्वामीद्वारा कृष्णकथा सादर होणार आहे. रात्री 12 वाजता आरती व त्यानंतर महाप्रसादाचे वाटप होणार आहे. शनिवार दि. 20 रोजी सकाळी शिलप्रभूपाद यांची पादपूजा आणि नंदोत्सव, दुपारी 1.30 वाजता महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे. सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.









