गोकुळ शिरगाव वार्ताहर
गोकुळ शिरगाव एमआयडीसी शेजारी माधवनगर येथे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज मोठ्या प्रमाणात आहे, या इंडस्ट्रीला गेल्या दोन महिन्यापासून विजेच्या लपंडावाने चांगलेच परेशान करून सोडले आहे, या ठिकाणी जवळपास 25 ते 30 छोटे मोठे उद्योग आहेत. सततच्या वीज ये जा करण्याने मशीन शॉप बंद पडत आहेत ,शिवाय याचा फटका मशीनला सुद्धा बसत असल्याची तक्रार उद्योजक करत आहेत. त्याचबरोबर विज गेल्याने पुढील कस्टमर डिलिव्हरी देताना त्रास होत आहे ,वेळेत डिलिव्हरी होत नसल्यामुळे उद्योजकांचा समोरील ग्राहकांच्या बरोबर वाद विवादाचे प्रसंग सुद्धा घडत आहेत.
या ठिकाणी बरेच जॉब क्रेन लावून मशीन शॉप वर व मालवाहतूक गाडीत भरले जातात. बऱ्याच वेळेला क्रेनला जॉब लावून उचलला की लाईट हमखास गेलेली असते त्यामुळे या ठिकाणी कारखानदारांना ट्रान्सपोर्ट खर्च सुद्धा सोसावा लागतो.
या ठिकाणी असलेल्या पी. पी .इंडस्ट्रीजचे मालक भाऊसाहेब पर्वते पाटील यांनी गेल्या दोन महिन्यापासून वीज वितरण चे अधिकारी यांच्याबरोबर सातत्याने संपर्क साधुन होणारे नुकसान निदर्शनास आणून दिले आहे. पण याचा काही उपयोग आजपर्यंत झाला नसल्याचे उद्योजक पाटील यांनी यावेळी सांगितले.
गतिमान शासन व उद्योगमंत्र्यांनी नुकतीच गोकुळ शिरगाव एमआयडीसीला स्मॉल स्केल इंडस्ट्रीचा मोठा दर्जा देऊ शिवाय इंडस्ट्री वाढीसाठी जे काही करता येईल ते करू अशी ग्वाही सुद्धा त्यांनी दिली आहे. शिवाय खासदार मंडलिक यांनी सुद्धा विजेचे दर कमी करून स्मॉल स्केल इंडस्ट्रीजला वीदर कमी केल्याने आपला उद्योग वाढवण्यास संधी मिळणार आहे अशी घोषणा झाली आहे. पण या ठिकाणी गेल्या दोन महिन्यापासून या विजेच्या लपंडाव सतत होत असल्याने इथला स्मॉल स्केल इंडस्ट्रीला चांगलाच मानसिक त्रास होत आहे. या सर्व घोषणाच होत असून चालू असलेल्या उद्योजकांना चांगली सर्विस देणे आता काळाची गरज असल्याचे मत ज्येष्ठ उद्योजक व गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे माजी अध्यक्ष पर्वते पाटील यांनी यावेळी तरुण भारत संवादशि बोलताना हि माहिती दिली .









