गोकुळने गेल्या चार वर्षात दूध खरेदी दरात 12 रुपयांची वाढ केली आहे
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) गाय व म्हैस दुधाच्या विक्री दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार म्हैस दुधाचा प्रतिलिटर दर 68 रुपये तर गाय दुधाचा दर 50 रुपये असणार आहे. सोमवार, 5 मे पासून ही दरवाढ लागू होणार आहे. गोकुळने गेल्या चार वर्षात दूध खरेदी दरात 12 रुपयांची वाढ केली आहे. जानेवारी 2025 मध्ये गोकुळने म्हैस दूध खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ केली होती.
11 जानेवारीपासून ही दरवाढ लागू केली आहे. मात्र यावेळी विक्री दरामध्ये कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती. यानंतर 1 एप्रिल 2025 पासून गोकुळने गाय दूध खरेदी दरातही प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ केली होती. खरेदी दरात वाढ करताना विक्री दरामध्ये कोणतीही वाढ केली नव्हती. आता मात्र गोकुळने विक्री दरातही वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार, 5 मे पासून गोकुळच्या गाय व म्हैस दुधाच्या कोल्हापूरमधील विक्री दरात दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे.








