फक्त अडीच वर्षेच आमची सत्ता असून आम्ही सत्तेचा गैरवापर कधी केला नाही. मागील 25 वर्षाच्या लेखा परीक्षणाची ही मागणी त्यांनी करायला हवी. असे मत कॉंग्रसचे जिल्हा अध्यक्ष आणि आमदार सतेज पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केला. राज्य शासनाने कोल्हापूरातील गोकुळ जिल्हा दुधसंघाच्या लेकापरिक्षणाच्या निर्णायनेतर कोल्हापूरातील राजकिय वातावरण चांगलेच तापले असताना त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
कॉंग्रेस आमदार सत्यजीत कदम यांच्यासह घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना आमदार पाटील म्हणाले, “गेली फक्त अडीच वर्षे आमची सत्ता होती पण आम्ही सत्तेचा गैरवापर केला नाही. 25 वर्षे सत्ता भोगणाऱ्यांनी मागील 25 वर्षांच्याही लेखा परीक्षणाची मागणी करायला हवी.” अशी मागणी केली.
पुढे बोसताना ते म्हणाले, ” मनात आणले असते तर राजाराम कारखान्यावर आम्ही प्रशासक नेमला असता, गोकुळवर देखील आम्ही प्रशासक नेमला असता. पण लोकांनी आम्हाला पाच वर्षे सत्ता दिली आहे. पाच वर्षानंतर पुन्हा निवडणूक लागणार आहे त्यावेळी आपण पुन्हा लढू” असाही आमदार सतेज पाटलांनी विरोधकांना टोला लगावला आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









