महाराष्ट्र राज्याच्या सहकार धोरण समितीवर डॉ. नरके यांची निवड
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्याच्या नवीन सहकार धोरण समितीवर नियुक्ती झाल्याबद्दल डॉ. चेतन अरुण नरके यांचा गोकुळ दूध संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते मंगळवारी सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व संचालकासह अधिकारी उपस्थित होते. सहकार क्षेत्रातील प्रत्येक घटकासाठी कार्य करण्यास कटिबद्ध असल्याचे डॉ. चेतन नरके यांनी सांगितले.
यावेळी चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले, राष्ट्रीय सहकार धोरण २०२३ मधील शिफारसीचा अभ्यास करून राज्याच्या दृष्टीने सहकार धोरण ठरवण्यासाठीच्या महाराष्ट्र राज्याच्या समितीवर डॉ. चेतन नरके यांची नियुक्ती होणे संघाच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे.
सत्काराला प्रतिसाद देताना डॉ. चेतन नरके यांनी सांगितले की, गोकुळ परिवाराकडून मिळालेल्या सत्काराबद्दल मनःपूर्वक आभारी आहे. हा सन्मान फक्त वैयक्तिक नाही तर आपल्या संपूर्ण सहकार क्षेत्रासाठी मिळालेला आहे असे वाटते. महाराष्ट्र राज्याच्या नवीन सहकार धोरण समितीवर नियुक्त करून सहकार क्षेत्रातील कार्य अधिक परिणामकारकपणे पुढे नेण्याची संधी मिळाली आहे. सर्व सहकायांचे आणि गोकुळचे योगदान नेहमीच मार्गदर्शक राहिल.
या बैठकीत कोल्हापूर जिल्हा दूध संस्था कर्मचारी संघटनेच्या वतीने, गोकुळ दूध संघाने अलीकडेच गाय आणि म्हैस दूध खरेदी दरात वाढ, तसेच संस्था कमिशनमध्ये प्रति लिटर १० पैसे, सचिव कमिशनमध्ये पाच पेशांची वाढ, आणि महालक्ष्मी पशुखाद्याच्या दरात ५० रुपयांची कपात केल्याबद्दल संघाचे चेअरमन
आणि संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला.
यावेळी संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, बाबासाहेब चौगले, अजित नरके, शशिकांत पाटील, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, युबराज पाटील, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, अंजना रेडेकर, शौमिका महाडिक, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, संघाचे अधिकारी उपस्थित होते.








