Gokul Dudh Sangh : सत्ताधाऱ्यांनी वचनं पाळली नाहीत. सत्ताधारी सक्षम नाहीत. गोकुळच्या या सभेत त्यांना एकाही प्रश्नाचं समाधानकारक उत्तर देता आलं नाही. त्यांनी साध्या दूध धारकांची फसवणूक करू नये. शेतकऱ्यांच्या पैशावर दरोडा टाकण्याचा अधिकार कुणी दिला? असा सवाल शौमिका महाडिक यांनी सत्ताधाऱ्यांना केला. एकाही प्रश्नाला समाधानकारक उत्तर न दिल्यानं आम्ही सभा त्याग करत आहोत असं शौमिका महाडिक (Shoumika Mahadik) म्हणाल्या. जे ठराव चर्चेत नाहीत त्याला मंजुरी देण्यात आल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. या सभेत प्रचंड गदारोळ झाला. सभा संपण्याआधीच विरोधकांनी सभा त्याग केली. एकीकडे गोकुळची नियोजित सभा सुरु असतानाच दुसरीकडे विरोधकांनी समांतर सभा घेतली.
गोकुळच्या सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आज संघर्ष पाहायला मिळाला. सभा सुरु होण्याआधीच सभेत बसायला जागा मिळाली नाही. म्हणून विरोधकांनी सत्ताधाऱ्याविरोधात आरोप करत सभागृहात गोंधळ घातला. तर सभेत समाधानकारक उत्तरे नाही मिळाली तर समांतर सभा घेऊ असा इशारा याआधिच शौमिका महाडिक यांनी दिला होता. सभा सुरु होताच सभेत विरोधकाकडून नामंजूर च्या घोषणा देण्यात आल्या. यामुळे तणावपूर्ण वातावरणात सभेला सुरवात झाली. सुरवातीलाच अहवाल वाचन करण्यात आले. या वाचनानंतर हा अहवाल आम्हाला नामंजूर आहे अस शौमिका महाडिक म्हणताच त्यांच्या पाठोपाठ कार्यकर्त्यांनी ही घोषणाबाजी केली.यानंतर सभा त्याग करत समांतर सभा घेतली.
हेही वाचा- …नाहीतर समांतर सभा घेणार- शौमिका महाडिकांचा इशारा
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








