प्रतिनिधी,कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, गोकुळ नुतन अध्यक्षांची निवड गुरुवार 25 रोजी दुपारी 12 वाजता होणार आहे. अध्यक्षपदासाठी यापुर्वीच ज्येष्ठ संचालक अरुणकुमार डोंगळे यांचे नाव निश्चित झाले आहे. गोकुळ शिरगांव येथील प्रकल्पस्थळी अध्यक्ष निवडीची बैठक होणार आहे.
गोकुळमध्ये सत्तांतर घडविल्यानंतर आमदार सतेज पाटील, आमदार हसन मुश्रीफ यांनी ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांना प्रथम अध्यक्षपदी संधी देण्यात आली. ही संधी देत असताना दोन वर्षांनी विश्वास पाटील अध्यक्ष पदाचा राजीनामा देतील आणि पुढील दोन वर्ष ज्येष्ठ संचालक अरुणकुमार डोंगळे यांना संधी देण्यात येईल, असे ठरले होते. त्यानुसार 10 मे रोजी अध्यक्ष पाटील यांची मुदत संपली. यानंतर अध्यक्ष पाटील यांनी बुधवार 17 रोजी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. आता उद्या गुरुवार 25 रोजी नुतन अध्यक्ष निवडीसाठी संचालक मंडळाची बैठक होत आहे.
Previous Articleनवे शैक्षणिक धोरण पुढे ढकलणे योग्य : सरदेसाई
Next Article नव्या झुआरी पुलावर 274 वाहनचालकांकडून दंड वसुली









