गेल्या आठवड्यात चोरी झाल्याच्या निमित्ताने गाऱ्हाणा घालून ग्रामस्थांनी घेतला निर्णय
वार्ताहर/उचगाव
गोजगे येथील कलमेश्वर मंदिरामध्ये मागील आठवड्यात झालेल्या चोरीमुळे भाविकामध्ये नाराजी पसरली आहे. सोमवार दि. 21 एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता गाऱ्हाणा घालण्यासाठी गावातील हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गाऱ्हाणा घालून सव्वा महिन्यासाठी कलमेश्वर मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय गोजगे ग्रामस्थांनी घेतला. सोमवारी गावातून भव्य मिरवणुकीद्वारे मंदिरापर्यंत महिला, पुरुष, युवक युवती आणि सर्व ग्रामस्थ, मोठ्या संख्येने कलमेश्वर मंदिराच्या आवारात येऊन गाऱ्हाणा घालण्यात आला.
सोमवारी वार पाळणूक
चोरी केलेल्या चोरांना देवाचा कोप व्हावा, म्हणून दि. 21 एप्रिल रोजी मंदिरामध्ये गाऱ्हाणा घालण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सोमवारी संपूर्ण दिवस गावात वार पाळला होता . गाऱ्हाणाप्रसंगी देवस्थान कमिटीचे प्रमुख माजी ग्रामपंचायत अध्यक्ष शिवाजी यळगे, गुरुनाथ बामणे, निरंजन अष्टेकर, मनोहर पाटील, कल्लाप्पा कांबळे, कल्लाप्पा अष्टेकर, ज्योतिबा बेळगावकर, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.









