रेल्वेस्थानकावर सुरू केले दुकान : 2 तासात 3500 रुपयांची कमाई
जर तुम्हाला पैसे कमाविण्याची तीव्र इच्छा असेल तर तुम्ही काही ना काही करून अशी पद्धत शोधून काढता, ज्याद्वारे पैसे कमाविता येतील. चीनमधील एका युवतीने वेगळी कल्पना शोधून काढत ती अंमलात आणली आहे. ही युवती रेल्वेस्थानकावर मेकअप स्टॉल लावते.
तुम्ही मेकअप करण्यासाठी ब्युटी पार्लर किंवा मेकअप स्टुडिओ पाहिले असतील. परंतु कधी एखाद्या रेल्वेस्थानकावर मेकअपचा स्टॉल पाहिला नसेल. चीनमध्ये राहणाऱ्या देंग क्विक्वि नावाच्या युवतीने अजब व्यवसाय सुरू केला. ज्याप्रकारे लोक स्थानकावर स्टॉल लावून सामग्री विकतात, त्याचप्रकारे ही युवती सबवे स्टेशनवर स्वत:चा मेकअप स्टॉल लावते. चॉन्गक्विंगमध्ये शापिंगबा सबवे स्टेशनवर तिने हा स्टॉल लावला. क्विक्वि संध्याकाळी 5-7.30 वाजेपर्यंत हे काम करते आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचा फटाफट मेकअप करून पैसे कमाविते. ही सर्व्हिस केवळ वीकडेजमध्ये मिळते. तर वीकेंडवर गर्दी टाळण्यासाठी ती स्टॉल सुरू करत नाही.
केवळ अडीच तासात देंग सहजपणे 300 युआन म्हणजेच 3500 रुपये कमाविते. ती दिवसा तीन ते चार महिलांचा मेकअप करते आणि कुठलीच अॅडव्हान्स बुकिंग घेत नाही. लोक वेगवेगळ्या व्यवसायात व्यग्र असतात हे पाहून मी हा निर्णय घेतला. माझ्या ग्राहक या युवती असतात, ज्या कामानंतर पार्टी किंवा डेटवर जात असतात. त्यांना सौम्य मेकअप करून सुंदर करते आणि ज्यांना अधिक मेकअपची गरज असते, त्यांना स्वत:च्या स्टुडिओचा पत्ता देते असे 28 वर्षीय देंगने सांगितले आहे. लोकांना तिची ही कल्पना आवडली असून त्यांना चालता फिरता मेकअपची सुविधा मिळत आहे.









