नवी दिल्ली:
तैवानची गोगोरा ही इलेक्ट्रिक दुचाकी बनवणारी कंपनी भारतात प्रवेश करण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगण्यात येत आहे. इलेक्ट्रिक दुचाकी भारतात बनवण्याच्या योजनेवर कंपनी काम करत असल्याचे समजते. याद्वारे भारतातून दुचाकी बनवून त्या जागतिक स्तरावर पुरवण्याची तयारी कंपनीची असल्याचे समजते. स्वत:च्या दुचाकी तयार तर करणारच शिवाय इतरांना तंत्रज्ञान आणि रचना पुरवण्याची तयारीही कंपनी करत असल्याचे समजते. सदरची कंपनी बॅटरी स्वॅपिंग स्टेशन्सची सुविधादेखील उपलब्ध करते. बॅटरी स्वॅपिंग धोरण जाहीर झाल्यानंतर गोगोरा कंपनी पुढील दिशा याबाबतीत ठरवणार आहे. गुंतवणुकीची तयारी कंपनीने ठेवली असून संयुक्त भागीदारीचा पर्यायही अवलंबला जाणार आहे.
तैवानमध्ये गोगोरा ही कंपनी जवळपास 85 टक्के इतक्या इलेक्ट्रिक दुचाकी तयार करते. फिलीपीन्स, सिंगापूर, दक्षिण कोरिया, जपान, इस्त्राइल व चीन या ठिकाणी कंपनीचा विस्तार आहे.









