केएस चषक आंतर महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धा
बेळगाव : फॅब फुटबॉल क्लब आयोजित केएस चषक अंातर महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन दिवशी केएलई, गोगटे, लिंगराज, अंगडी कॉलेजने आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. सुभाषचंद्र बोस लेले मैदानावर स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे माजी उपमहापौर आनंद चव्हाण व उपस्थित मान्यवरांकडून फुटबॉलला किक देऊन स्पर्धेला चालना देण्यात आली. या स्पर्धेत 14 संघांनी भाग घेतला होता, पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात गोगटे कॉलेजने व्हीव्हीपी कॉलेजचा 1-0 असा, दुसऱ्या सामन्यात लिंगराज कॉलेजने सेंट पॉल्स पीयू कॉलेजचा 2-0, तिसऱ्या सामन्यात केएलई इंजिनिअरिंग कॉलेजने जीआयटी कॉलेजचा टायब्र्रेकर मध्ये 3-1, चौथ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात अंगडी इंजिनिअरिंग कॉलेजने लिंगराज पियू कॉलेजचा 1-0 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. मंगळवारी सकाळी उपांत्य फेरीचे सामने खेळविले जाणार आहेत. केएलई इंजिनिअरिंग विऊद्ध गोगटे कॉलेज सकाळी 9 वाजता. दुसरा उपांत्य फेरीचा सामना लिंगराज कॉलेज विऊद्ध अंगडी तांत्रिक कॉलेज यांच्यात सकाळी 10 वाजता होणार आहे. सायंकाळी अंतिम सामना होणार असून बक्षीस वितरण होणार आहे.









