वृत्तसंस्था /बेंगळूर
बांधकाम क्षेत्रातील दिग्गज कंपनी गोदरेज प्रॉपर्टीज यांनी आपल्या जूनअखेरच्या तिमाहीचा निकाल जाहीर केला असून जूनला संपलेल्या तिमाहीमध्ये गोदरेज प्रॉपर्टीजने 125 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे. विक्री बुकिंगच्या माध्यमातून कंपनीला सदरच्या तिमाहीत 2254 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत.
घर विक्रीत वाढ
तिमाहीच्या आधारावर पाहता निव्वळ नफ्यामध्ये 70 टक्के घट झालेली आहे. एप्रिल ते जूनच्या तिमाहीत महसूल 32 टक्के घटून 1315 कोटी रुपयांवर आला आहे. मागच्या वर्षी जूनअखेरच्या तिमाहीत कंपनीने 46 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. घर विक्रीच्या प्रमाणातही तिमाहीत 26 टक्के वाढ दिसली आहे. एप्रिल ते जून या कालावधीत प्रकल्पांच्या माध्यमातून विक्री बुकिंगमधून कंपनीने 2254 कोटी रुपये प्राप्त केले आहेत.
विक्री बुकिंगमधून मिळवलेली रक्कम
- शहर मिळवलेली रक्कम रुपयात
- मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन 656 कोटी
- दिल्ली-एनसीआर 548 कोटी
- बेंगळूर 509 कोटी
- पुणे 446 कोटी









