नवी दिल्ली / वृत्तसंस्था
गुजरातमध्ये 2002 मध्ये घडविण्यात आलेल्या भीषण गोध्रा जळीत कांडातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याचा प्रयत्न गुजरात सरकारकडून केला जाणार आहे, असे प्रतिपादन गुजरात सरकारने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात केले आहे. यह आरोपींना कनिष्ठ न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र, गुजरात उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा कमी करुन जन्मठेपेची शिक्षा दिली होती.
गुजरात उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात गुजरात सरकारने सर्वोच्च न्यायालयात अपील केले आहे. तसेच या जळीत कांडातील अनेक आरोपींनी आपल्याला जामीन मिळावा म्हणून सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर केल्या आहेत. यग्ना याचिकांना गुजरात सरकारने विरोध केला असून या सर्व आरोपींनी गंभीर गुन्हा केल्याने त्यांना फाशीची शिक्षा मिळणेच योग्य आहे, अशी भूमिका मांडली आहे. सर्वोच्च न्यायालयात जामीनाच्या अर्जांवर सुनावणी होत असताना राज्य सरकारच्या वकीलांनी या भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे.









