Godhra train burning case : गुजरातमधील जातीय दंगलीनंतर 2002 साली झालेल्या गोध्रा ट्रेन जाळपोळीतील आरोपीला सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी जामीन मंजूर केला. भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड ( DY Chandrachud) यांच्या अध्यक्षतेखालील आणि न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. आरोपी 17 वर्षांपासून तुरुंगात असून त्याने ट्रेनवर दगडफेक केली होती.
जामिन मंजून करताना खंडपीठाने म्हटले आहे की, “आरोपी फारुकने केलेला जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे. तो 2004 पासून कोठडीत असून त्याच्या शिक्षेविरुद्धचे अपील सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.” सत्र न्यायालयाने घातलेल्या अटी व शर्तींच्या अधीन राहून अर्जदाराला जामीन दिला जात आहे, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे. या खटल्याचे प्रतिवादी असलेले गुजरात राज्य सरकारच्या दाव्यानुसार, या जळितकांडातील आरोपींनी जमावाला चिथावणी देऊन कोचवर दगडफेक केली. प्रवाशांना जखमी केले आणि कोचचे नुकसान केले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









