ओटवणे प्रतिनिधी
सावंतवाडी शहरासह चराठा गावचे ग्रामदैवत असलेल्या श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव सोमवारी ८ जानेवारी रोजी होत आहे. नवसाला पावणारी आणि माहेरवाशिणींची पाठीराखी अशी सातेरीची ख्याती असल्याने या जत्रोत्सवासाठी भाविकांची अलोट गर्दी होते.यानिमित्त मंदिरात सकाळी धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर सातेरी देवीला भरजरी वस्त्र व सुवर्ण अलंकारांसह आकर्षक फुलांनी सजविण्यात येणार आहे. त्यानंतर देवस्थानच्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत देवीची मानाची ओटी भरल्यानंतर देवीच्या दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी होणार आहे.
तसेच देवीची ओटी भरण्यासाठी सावंतवाडी शहरासह चराठा गावातील माहेरवाशिणींची व महिलांची अलोट गर्दी होते. रात्री सवाद्य पालखी मिरवणूकीनंतर फटाक्यांच्या आतषबाजीत आरोलकर दशावतार कंपनीचे नाटक होणार आहे.









