कर्नाटक शेळी लोकर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे मोबाईल ऍप कार्यान्वित : खरेदी-विक्री ऑनलाईनद्वारे
प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटक शेळी व लोकर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने (केएसडब्ल्यूडीसीएल) शेळय़ा-मेंढय़ांची विक्री करण्यासाठी डिजिटल मार्केटिंग प्लॅटफॉर्म उपलब्ध केला आहे. त्यामुळे शेतकऱयांना आता शेळय़ा-मेंढय़ांची विक्री करणे सहज शक्मय होणार आहे.
जिल्हय़ात 28 लाखांहून अधिक जनावरांची संख्या आहे. त्यामध्ये शेळय़ा-मेंढय़ांची संख्याही समाधानकारक आहे. मात्र, शेळय़ा-मेंढय़ा विक्री करण्यासाठी विशेष बाजारपेठ नसल्याने शेतकऱयांसमोर अडचणी निर्माण होतात. अशा परिस्थितीत पशुपालकांना हा डिजिटल प्लॅटफॉर्म सोयिस्कर ठरणार आहे. याकरिता मोबाईल ऍप कार्यान्वित केले आहे. या माध्यमातून शेळय़ा-मेंढय़ांची विक्री करणे सोयिस्कर होणार आहे. ग्रामीण भागातील शेतकऱयांना शेळय़ा-मेंढय़ांची विक्री करण्यासाठी आठवडी बाजारात धाव घ्यावी लागते. त्यामुळे वाहतुकीसाठी खर्च करावा लागतो. मात्र, या ऍपमुळे घरबसल्या शेळय़ा-मेंढय़ांची विक्री करता येणार आहे.
ग्रामीण भागात जोडधंदा म्हणून गायी-म्हशी आणि शेळय़ा-मेंढय़ांचे पालन केले जाते. शिवाय धनगर समाज अधिक प्रमाणात शेळय़ा-मेंढय़ांची पैदास करतात. त्यामुळे अलीकडे शेळय़ा-मेंढय़ांची संख्या वाढली आहे. त्यांच्या विक्रीसाठी कर्नाटक शेळी व लोकर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने पुढाकार घेतला आहे. शिवाय मोबाईल ऍपची निर्मिती केली आहे. एनसीडीईएक्सई मार्केट लिमिटेड यांचे एनईएमएल नावाचे ऍप आहे. इच्छुकांनी व संबंधितांनी प्ले-स्टोअरमधून हे ऍप डाऊनलोड करून शेळय़ा-मेंढय़ांची विक्री करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या ऍपवर शेळय़ा-मेंढय़ांचे फोटो अपलोड करताना त्यांचे वजन, लिंग, ठिकाण, जात, किंमत आणि इतर गोष्टी अपलोड कराव्या लागणार आहेत. फोटो अपलोड करताना मालकाचे आधारकार्ड व मोबाईल क्रमांक द्यावा लागणार आहे. शिवाय व्यवहार ठरल्यानंतर आर्थिक क्यवहार ऑनलाईनच्या माध्यमातून होणार आहे. दरम्यान, या डिजिटल व्यवहारामुळे पशुपालकांची कोणतीही फसवणूक होणार नाही. उलट फसवणुकीच्या प्रकाराला यामुळे चाप बसणार आहे.
सध्याच्या काळात स्मार्टफोनमुळे जग अगदी जवळ येऊन ठेपले आहे. जे आपण विचार करतो ते काही क्षणातच उपलब्ध होते. ग्रामीण भागात स्मार्टफोनचा वापर वाढला आहे. त्यामुळे या माध्यमातून शेळय़ा-मेंढय़ांची विक्री करणे सोयिस्कर होणार आहे. कर्नाटक शेळी व लोकर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने शेळय़ा-मेंढय़ांच्या विक्रीबरोबर शेळी पालनासाठी साहाय्यभूत असे मोबाईल ऍप तयार केले आहे. याद्वारे शेतकऱयांना शेळी पालनाविषयी इत्थंभूत माहिती उपलब्ध होणार आहे.
जिल्हय़ातील शेळय़ा-मेंढय़ाची संख्या
| तालुका | शेळी | मेंढी |
| अथणी | 70420 | 47675 |
| बैलहोंगल | 26466 | 32398 |
| बेळगाव | 27479 | 308590 |
| चिकोडी | 51367 | 130273 |
| गोकाक | 95838 | 118977 |
| हुक्केरी | 57890 | 120770 |
| खानापूर | 13180 | 434 |
| रायबाग | 57094 | 106185 |
| रामदुर्ग | 51680 | 107938 |
| सौंदत्ती | 40131 | 93415 |
फसवणुकीचे प्रकार कमी होणार

शेळय़ा-मेंढय़ा पालन करणाऱया शेतकऱयांसाठी नवीन मोबाईल ऍप कार्यान्वित केले आहे. या माध्यमातून शेळय़ा-मेंढय़ांची विक्री करणे सहज शक्मय होणार आहे. संबंधितांनी हे ऍप डाऊनलोड करून शेळय़ा-मेंढय़ांची विक्री करावी. त्यामुळे फसवणुकीचे प्रकार कमी होणार आहेत. शिवाय घरबसल्या शेळय़ा-मेंढय़ांची विक्री करता येणार आहे.
-डॉ. सुधा देवरेड्डी (डेप्युटी डायरेक्टर, केएसडब्ल्यूडीसीएल)









