बकरी मंडईत खरेदी-विक्री
बेळगाव : दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर बकरी बाजाराला बहर आला आहे. शनिवारी गणाचारी गल्ली येथील बकरी मंडईत बकऱ्यांची खरेदी-विक्री वाढली होती. श्रावण व गणेशोत्सवानंतर काही ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. त्यामुळे बकऱ्यांची मागणी वाढू लागली आहे. पाऊस कमी झाल्यानंतर बकऱ्यांचा बाजारही पूर्ववत सुरू होऊ लागला आहे. त्यामुळे उलाढालही वाढू लागली आहे. बकरी मंडईत शेळ्या, मेंढ्या विक्रीसाठी दाखल झाल्या होत्या. 5 हजार ते 20 हजारपर्यंत या शेळ्या, मेंढ्यांच्या किमती होत्या. दसऱ्यासाठी काही शेळ्या, मेंढ्या खरेदी केल्या जातात. तत्पूर्वी ही खरेदी-विक्री होत असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.









