पणजी : लोकसभा निवडणुकीपुर्वी गोव्याचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे. केंद्र सरकारचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरच गोवा सरकारचा अर्थसंकल्प मांडला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापुर्वी अर्थसंकल्प मांडण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे गोवा विधानसभा अधिवेशन फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये होण्याची शक्यता आहे. जानेवारीत अधिवेशन घेतले तर पुन्हा अर्थसंकल्पसाठी अधिवेशन घ्यावे लागणार आहे. म्हणून जानेवारीऐवजी नंतरच अधिवेशन घेण्याचा सरकारचा विचार आहे.
Previous Articleकळंगूटमधील 13 ही बेकायदेशीर डान्स बारना टाळे ठोका
Next Article गोव्यात वैज्ञानिक संस्कृती रुजविण्याचा प्रयत्न
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









