पेडे
क्रीडा संकुलातील ऍस्ट्रोटर्फ मैदानावर खेळविण्यात येत असलेल्या 12व्या राष्ट्रीय सब-ज्युनियर हॉकी स्पर्धेत गोव्याने विजय प्राप्त करताना पुडिचेरीचा 6-0 गोलानी पराभव केला. गोव्यासाठी दीपक नाविकने तीन, पंकज नाईकने दोन तर किरण लमाणीने एक गोल केला. या सामन्यात पूर्णता गोव्याचे वर्चस्व आढळले. गोव्याच्या आक्रमक खेळासमोर पुडिचेरीचा बचाव दिशाहीन ठरला.
अन्य लीग लढतीत बिहारने अरुणाचल प्रदेशचा 10-2, जम्मू काश्मिरने तेलंगणाचा 4-0, चंदीगढने महाराष्ट्रचा 11-3, मध्यप्रदेशने आसामचा 7-1 तर पंजाबने दिल्लीचा 8-0 असा पराभव केला.









