रामकुमार शेषु यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
प्रतिनिधी/ बेळगाव
मी करू शकतो ही भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली पाहिजे. त्यामुळे निश्चितच विद्यार्थी आपले ध्येय गाठू शकतात. तेव्हा सकारात्मक राहून ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे असल्याचे रामकुमार शेषु यांनी सांगितले.
कर्नाटक सोसायटीच्या गोगटे अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये चौथ्या सेमीस्टरच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे याचबरोबर रोजगार क्षमता गुणांक वाढविणे यासाठी या व्याख्यानाचे आयोजन केले होते. यावेळी शेषु यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी मौलिक मार्गदर्शन केले.
गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन राजेंद्र बेळगावकर यांनीही विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे महत्त्व सांगितले. प्रारंभी प्राचार्य डॉ. जे. के. कित्तूर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. प्रा. सागर संताजी आणि विद्यार्थिनी प्रियांका पाटील यांनी सूत्रसंचालन केले. या व्याख्यानाला 350 हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते.









