प्रतिनिधी /पणजी
माजी क्रिकेटपटू आणि माजी खासदार कीर्ती आझाद यांची तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी गोवा तृणमूल काँग्रेस पक्षाच्या डेस्क ईन्चार्ज पदी नियुक्ती केली आहे.
तृणमूल काँग्रेसच्या गोवा विधानसभा निवडणुकीत दणदणीत पराभव झाल्याने बहुतेक सर्वच पदाधिकाऱयांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामाही दिलेला आहे. त्यामुळे आता गोव्याची जबाबदारी कीर्ती आझाद यांच्यावर सोपविलेली आहे. त्यांना राज्य पातळीवर नवी समिती देखील स्थापन करायची आहे.
प्रदेशाध्यक्षपदास लुईझिनचा नकार
दरम्यान, प्रदेश तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सुत्रे स्वीकारण्यास लुईझिन फालेरो यांनी नकार दर्शविला आहे. आपण राज्यसभा या नात्याने दिलेली जबाबदारी सांभाळीत आहे. स्थानिक राजकारणात पडण्याची इच्छा नाही, असे त्यांनी सांगितले.









