विविध खात्यांतील 439 पदांचा समावेश : अर्ज करण्याची अंतिम मुदत 8 ऑगस्ट
पणजी : गोवा राज्य कर्मचारी निवड आयोगामार्फत विविध सरकारी विभागांमध्ये मोठी नोकरभरती करण्यात येणार आहे. आयोगाने विविध खात्यातील विविध पदांसाठी 439 रिक्त पदे भरण्याची घोषणा केली आहे. यामध्ये स्थापत्य खात्यात कनिष्ठ अभियंत्यांची सर्वाधिक 132 पदे भरण्यात येणार आहेत. राज्य कर्मचारी निवड आयोगाकडून विविध सरकारी विभागात भरण्यात येणाऱ्या 439 पैकी अकाउंटट (22), सहाय्यक राज्य कर अधिकारी (9), राज्य कर निरीक्षक (34), मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल विभागात कनिष्ट अभियंता (25), विद्युत खात्यातील कनिष्ठ अभियंता (88), स्थापत्य खात्यातील कनिष्ठ अभियंता (132), विस्तार अधिकारी (12), स्टेशन ऑपरेटर (35), वायरलेस ऑपरेटर सहाय्यक उपनिरीक्षक (3), डिझेल मेकॅनिक ग्रेड-1 (1), कृषी सहाय्यक (4), इलेक्ट्रिशियन (1), लाईनमन/वायरमन (35), मीटर रीडर (31), सहाय्यक इलेक्ट्रिशियन (1), सहाय्यक मेकॅनिक (2), सहाय्यक लाईट ऑपरेटर (2) आणि इलेक्ट्रीशियन मदतनीस (1) या पदांचा समावेश आहे.
या पदांविषयीची माहिती गोवा राज्य कर्मचारी निवड आयोगामार्फत https://gssc.goa.gov.in या संकेतस्थरावर उपलब्ध आहे. यामध्ये खुला वर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी, आर्थिक मागास या घटकातील उमेदवारांसाठी भरण्यात येणाऱ्या पदांची सविस्तर माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेली आहे. भरण्यात येणाऱ्या सर्व पदांसाठी उमेदवारांनी 8 ऑगस्ट 2025 या दिवसापर्यंत अर्ज सादर करावेत, असे राज्य कर्मचारी निवड आयोगाने स्पष्ट केले आहे. मोठ्या प्रमाणात भरती होणार असल्याने बेरोजगार युवकांसाठी सरकारी खात्यांत नोकरीची ही संधी सरकारने उपलब्ध केलेली आहे.









