सहभागी उद्योजकांना विविध चर्चासत्रे, तज्ञ मंडळीचे विचार, केंद्रीय मंत्र्यांशी थेट संवाद यांचा लाभ मिळणार
प्रतिनिधी /पणजी
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्र हे भारतातील एक अत्यंत गतिमान क्षेत्र म्हणून उदयास आले आहे. गोव्यातील एमएसएमई व्यवसायांची वाढ आणि उत्पादकता सुनिश्चित करण्यासाठी, लघु उद्योग भारती (एलयुबी) गोवा चॅप्टरतर्फे शुक्रवार दि.
6 रोजी सकाळी 9.30 ते संध्याकाळी 6.30वा दरम्यान दरबार हॉल, राजभवन, दोनपावला – गोवा येथे गोवा एमएसएमई अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात एमएसएमई धोरणे, बिझनेस ब्रँडिंग टूल्स, बिझनेस ऑटोमेशन तंत्रज्ञान, अपारंपरिक वित्तीय स्रोतांची ओळख, निर्यात का आणि कशी, एमएसएमईच्या वाढीसाठी कृती आराखडा आणि अमृतकाळात एमएसएमईसाठी व्यवसायाच्या संधी या व अशा अनेक विषयांवर केंद्रीय मंत्री आणि औद्योगिक तज्ञांची सत्रे होणार आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री, डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय एमएसएमई मंत्री, नारायण राणे, केंद्रीय वित्त राज्यमंत्री, डॉ. भागवत कराड आणि उद्योग व वाहतूक मंत्री, माविन गुदीन्हो यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होईल.
हा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत अजेंडाच्या टाइमलाइनला अनुसरून केंद्रीय मंत्र्यांची थेट सत्रे, गोव्यातील 500 पेक्षा अधिक एमएसएमई सह नेटवर्क, नवीन एमएसएमई धोरणांवरील औद्योगिक तज्ञांची सत्रे, व्यवसाय ऑटोमेशनसाठी तंत्रज्ञानातील नावीन्य शिकणे, साधने, व्यवसाय ब्रँडिंगसाठी, मानद वक्ते, औद्योगिक नेत्यांशी पॅनेल चर्चा, अमृतकाळ दरम्यान एमएसएमईसाठी व्यवसाय संधी आणि तज्ञांचे विचार या सत्रांनी सुरुवात होईल.
या कार्यक्रमाच्या उद्देशाविषयी जनजागृती करण्यासाठी, एलयुबी चे राष्ट्रीय उपाध्यक्ष
रवींद्र सोनावणे, एलयुबी गोवा राज्य अध्यक्ष, राजकुमार कामत, एलयुबी गोवा राज्य उपाध्यक्ष, मनोज पाटील, एलयुबी गोवा राज्य सरचिटणीस, अरमान बकले, एलयुबी गोवा संयुक्त सचिव, मुदित अग्रवाल आणि एलयुबी गोवा राज्य कोषाध्यक्ष, सहयोगी भागीदार, लघु उद्योग भारती (एलयुबी), गोवा एमएसएमई अधिवेशन, राकेश कुमार, सहाय्यक महाव्यवस्थापक, प्रमुख – रिटेल आणि मिड कॉर्पोरेट सेंटर, पंजाब नॅशनल बँक – गोवा, मंदार म्हापसेकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
पंजाब नॅशनल बँक – गोवा ही लघु उद्योग भारती (थ्ळँ) गोवा अध्याय श्एश्ं अधिवेशन ची सहयोगी भागीदार आहे.
श्री विजय दुबे, कार्यकारी संचालक, पंजाब नॅशनल बँक आणि शीर्षक प्रायोजक गोवा लघु उद्योग भारती (एलयुबी) श्एश्ं वाढीमध्ये बँकिंगच्या भूमिकेवर अधिवेशनाला संबोधित करतील
एलयुबी गोवा राज्य अध्यक्ष, श्री. राजकुमार कामत यांनी या कार्यक्रमाच्या उद्देशाबद्दल प्रसारमाध्यमांना संबोधित केले. ते म्हणाले, की “आम्ही गोव्यातील एमएसएमईंना त्यांच्या उद्योगात वाढ करण्याची संधी देऊ इच्छितो. गोवा हे व्यवसाय केंद्रित राज्य आहे. येथे अनेक व्यवसायांनी आधीच जम बसविला आहे. आणखी बरेच व्यवसाय नवीन आहेत आणि म्हणूनच हा कार्यक्रम व्यवसाय मालक आणि उद्योजकांना त्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे देईल. एलयुबीमध्ये आम्ही प्रत्येक व्यवसायिकाला विविध तज्ञ आणि स्त्राsतांच्या मदतीने योग्य ज्ञान घेऊन त्यांचा व्यवसाय वाढविण्यासाठी मदत करतो.”
श्री. कामत पुढे म्हणाले, की “जीएसआयए आणि जीसीसीआय राज्य सरकारसोबत गुंतवणूकीचे उत्तम काम करत असताना, एमएसएमई संबंधित समस्या केंद्र सरकारपर्यंत पोचविण्याची गरज आहे. एलयूबी गोवा प्रामुख्याने या पैलुंवर लक्ष केंद्रित करेल, तसेच गोव्यातील एमएसएमई वाढीला देखील मदत करणार आहे.”
एलयुबी चे राष्ट्रीय उपाध्यक्ष, रवींद्र सोनवणे म्हणाले, की “आम्ही एमएसएमई उद्योगात आधीच इतिहास रचला आहे आणि आता या क्षेत्रात आणखी यश मिळवण्याची वेळ आली आहे. आमच्याकडून मिळालेली प्रत्येक कामगिरी तुम्हाला तुमचा व्यवसाय कसा वाढवायचा याची माहिती देईल.”
एलयुबी गोवाचे राज्य उपाध्यक्ष श्री. मनोज पाटील यांनी मान्यवरांच्या उपस्थिती बद्दल माहिती दिली.
एलयुबी चे राज्य सरचिटणीस, श्री अरमान बकले यांनी बोलताना नमूद केले, की या कार्यक्रमात असंख्य तज्ञ उपस्थित राहणार आहेत, जे व्यवसाय मालक आणि उद्योजकांना नवनविन तंत्रज्ञान आणि व्यवसाय ब्रँडिंगची माहिती देऊन मदत करेल.
एलयुबी गोवाचे संयुक्त सचिव, श्री. मुदित अग्रवाल म्हणाले, की तज्ञांनी दिलेले तांत्रिक औद्योगिक ज्ञान एमएसएमईंना त्यांच्या संबंधित क्षेत्रात, आधुनिकीकरणाला अनुसरून प्रगती करण्यास मदत करेल.
अधिवेशनात एमेरिटस – एमएआयटी चे अध्यक्ष, श्री नितीन कुंकळय़?कर, अमृतकाळाकडे लक्ष वेधतील. ते गोव्यातील एमएसएमईसाठी संधी यावर विचार व्यक्त करतील.बीएसई इंडिया मधील एसएमई आणि स्टार्टअप्सचे प्रमुख, श्री. अजय ठाकूर बीएसई एसएमई आयपीओच्या माध्यमातून वाढीचे मुद्दे अधोरेखित करतील. इइपीसी इंडिया, मुंबईचे संचालक व विभागीय प्रमुख, डॉ. रजत श्रीवास्तव, निर्यात का आणि कशी याविषयी बोलतील.
– एमएसएमइ चे सह-संस्थापक आणि सीईओ, मालिका उद्योजक आणि ऐंजल इन्व्हेस्टर श्री. अमित कुमार, इक्वटी फंडरेझिंगद्वारे अनलॉक केलेल्या 20x मूल्याच्या मालिकेवर प्रकाश टाकतील.
– आयआयएम चे माजी विद्यार्थी तथा आणि 15 पेक्षा जास्त वर्षांचा अनुभव असलेले आघाडीचे ब्रँड सल्लागार श्री. अमेय मोहने, एसएमइ वाढीसाठी ब्रँड शस्त्राविषयीचे मुद्दे अधोरेखित करतील.
व्यवसाय प्रशासन प्रशिक्षक आणि टेड एक्सचे वक्ते,केवल किशन, कधीही, कुठेही व्यवसाय प्रक्रिया ऑटोमेशनच्या मुद्यांवर लक्ष केंद्रित करून, त्यावर भाष्य करतील.
चर्चासत्रात हर्षवर्धन भटकुळी आणि दामोदर कोचकर, जीएसआयएचे अध्यक्ष मॉडरेटर असतील. ते इतर मान्यवरांसोबत एमएसएमईच्या वाढीसाठी कृती आराखडय़ावर चर्चा करतील. http://mygrid.club/goamsme वर नोंदणी करा किंवा मुदितः 9923711811, अरमानः 9011230235 यावर संपर्क साधाः









