वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कलिगा स्टेडियमवर सुरू असलेल्या कलिंगा सुपर चषक फुटबॉल स्पर्धेत एफसी गोवा आणि एफसी पंजाब यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला.
या स्पर्धेतील खेळविण्यात आलेल्या सामन्यात एफसी गोवा संघाने गोकुळा केरळ एफसी संघाचा 3-0 असा एकतर्फी पराभव करत शेवटच्या 8 संघात स्थान मिळविले. या सामन्यात केरळ संघाला शेवटपर्यंत आपले खाते उघडता आले नाही. गोवा संघातर्फे गुरोटेक्सेनाने शानदार हॅट्ट्रीक नोंदविली. त्यांनी आता एफसी गोवा संघातर्फे 45 सामन्यांत 23 गोल नोंदविले आहेत.
दुसऱ्या सामन्यात एफसी पंजाब संघाने ओडीशा एफसी संघाचा 3-0 असा फडशा पाडत शेवटच्या 8 संघात स्थान मिळविले आहे. ओडीशा पंजाब संघातर्फे निहाल सुदेश, इझक्वेल व्हिडाल तसेच सुलजिक यांनी प्रत्येकी 1 गोल नोंदविला.








