लांजा प्रतिनिधी
लांजा तालुक्यातील कोर्ले येथे २४ लाखांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा मुद्देमाल जप्त केला आहे. निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क लांजा विभागाने धडक कारवाई करत हा मद्यसाठा जप्त केला.
गोव्याहून मुंबईचा दिशेने मद्याची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहकाला सापळा रचून पकडण्यात राज्य उत्पादन शुल्क लांजाच्या पथकाला यश आले. ही कारवाई बुधवार २६ एप्रिल रोजी सकाळी ९.४५ वाजण्याचा सुमारास करण्यात आली. महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ अ, ई, ८१, ९० व १०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.