बेंगळूर येथील युवकाला अटक
प्रतिनिधी/ बेळगाव
व्हीटीयूजवळ गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली आहे. शनिवार दि. 17 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजता अबकारी अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली असून इनोव्हासह 20 लाख 35 हजार 688 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
प्रशांतकुमार बी. एल. (वय 38 रा. सिंगनायकनहळ्ळी यलहंका-बेंगळूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. केए 52, एम 8347 क्रमांकाच्या इनोव्हातून 109 लिटर गोवा बनावटीची दारू वाहतूक करताना विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळ त्याला अटक करण्यात आली आहे.
अबकारी उपअधीक्षक रवी मुरगोड यांच्या नेतृत्वाखाली अबकारी निरीक्षक मंजुनाथ गलगली, उपनिरीक्षक सिद्धाप्पा यरगट्टी, मंजुनाथ मास्तमर्डी, बनप्पा मेळवंकी, गुंडू पुजारी, अमृत पुजारी, सुनील पाटील, एम. एफ. कटगेन्नावर आदींनी ही कारवाई केली आहे. जप्त दारूसाठ्याची किंमत 35 हजार 688 रुपये इतकी होते.









