मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन
पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत देश एक अग्रगण्य स्टार्टअप राष्ट्र बनण्याच्या मार्गावर वेगाने वाटचाल करत आहे आणि यामध्ये ईडीआयआय महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. गोवा एक मजबूत स्टार्ट-अप-केंद्रित परिसंस्था उभारण्यास उत्सुक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. भारतीय उद्योजकता विकास संस्थेने काल आपला 43 वा स्थापना दिन गोव्यात साजरा केला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री सावंत यांनी व्हर्च्युअल पद्धतीने भाषण करताना गुजरातच्या अद्वितीय विकास मॉडेलचे कौतुक केले आणि देशात आणि बाहेर उद्योजकतेचा प्रसार केल्याबद्दल ईडीआयआयला श्रेय दिले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रसना ग्रुपचे अध्यक्ष डॉ. पिऊझ खंबाटा, सन्माननीय पाहुणे म्हणून सुनील अंचिपाका, आयडीबीआय बँकेचे व्यवस्थापकीय संचालक बी. एस. पै आंगले, व्यवस्थापकीय संचालक, आयडीबीआय बँक लिमिटेड, अहमदाबाद येथील मुख्य महाव्यवस्थापक दिनेश सिंग रावत, महासंचालक डॉ. सुनील शुक्ला उद्योजकता, स्टार्टअप्स आणि नवोपक्रम देशाच्या सामाजिक-आर्थिक विकासावर कसा परिणाम करत आहेत यावर भर देणाऱ्या या कार्यक्रमात सरकार, कॉर्पोरेट्स, उद्योग संघटना आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. दिनेश सिंग रावत, डॉ. पिऊझ खंबाटा, सुनील अंचिपाका यांचीही भाषणे झाली.









