rवीजपुरवठा विषयक कामांसाठी 45 कोटींची तरतूद
पणजी : जी20 परिषदेच्या गोव्यामध्ये नियोजित बैठक आयोजन स्थळांच्या भागात तसेच निमंत्रित प्रतिनिधींच्या ज्या ज्या भागामध्ये इतर भेटी आयोजित करण्यात येणार आहे, अशा भागातही नियमित व विनाव्यत्यय वीजपुरवठा करत हा भाग प्रकाशमान ठेवण्याबाबतची तयारी गोवा विद्युत विभागाकडून करण्यात आली आहे. याबाबत जी-20 परिषदेचे नोडल अधिकारी संजित रॉड्रिग्ज म्हणाले, “जी-20 बैठकांसाठी विनाव्यत्यय वीजपुरवठाबाबतची अनिवार्यता हे कारण गोव्यात वीजपुरवठा जाळ्यातील समस्या दूर करत नवीन स्मार्ट, बचत करणारी वीज उपकरणे बसवण्यात आल्याने गोव्यासाठी लाभदायक ठरले आहे. या नव्या सुविधांनी उजळून निघालेले पणजी शहर हा मोठा बदल घडून आला आहे.” राज्यात नियोजित आठ जी20 बैठकांच्या पार्श्वभूमीवर नियोजित कार्यक्रम स्थळांच्या भागात वीज वितरण जाळ्यातील बहुतांश समस्या दूर करण्यात आल्या असून वीज पुरवठा सुविधा अंतिम टप्प्यात आहेत. “गुणवत्तापूर्ण वीजपुरवठा हा विनाव्यत्यय होणे आवश्यक असते. वीज पुरवठ्यात व्यत्यय आणणाऱ्या अडचणी तसेच इतर साधनसुविधांमधील समस्या दूर केल्याशिवाय गुणवत्तापूर्ण वीजपुरवठा करणे शक्मय होत नाही,” अशी माहिती वीज खात्याचे कार्यकारी अभियंता अऊण पाटील यांनी दिली.
वीज पुरवठाविषयक कामांसाठी 45 कोटी ऊपयांची तरतूद झाल्यानंतर पणजी शहर उजळून निघाले आहे. सद्यस्थितीचा विचार करून तसेच आधुनिक व वीजबजत करणारे पथदीप लावण्याच्या उदेशाने या पट्ट्यामघ्य?ही एलईडी पथदीप खांब उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता मिरामार पासून कंदब बसस्थानकापर्यंतचा रस्ता आणि मेरशी सर्कल ते जुने गोवे सर्कल हा रस्ता 1400 एलईडी पथदीपांमुळे हा एकाच प्रकाशसंगतीत उजळून निघाला आहे. स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत अल्तिनो येथील सेंट्रल कमांड सेंटरमधून वीजपुरवठा, पाणीपुरवठा आणि सीसीटीव्ही पॅमेरा जाळे यांचे व्यवस्थापन केले जाणार आहे. “एकाच ठिकाणाहून कोणता पथदीप कार्यरत नाही हे आम्हास शोधता येणार आहे. तसेच कार्यक्षम व आवश्यकतेनुसार प्रकाश पसरवण्यासाठी या पथदीपांच्या प्रकाशाची तीव्रता कमी-जास्त करता येणार आहे,” अशी माहितीही अभियंता पाटील यांनी दिली. जी20 बैठकांच्या पार्श्वभूमीवर इतर विभागांशी संबंधित कामांतील 70-80 टक्के कामे वीज खात्याने हाती घेतली आहेत. “जी20 बैठकांसाठी, महत्त्वाची कामे पूर्णत्वास आली आहेत. त्यामुळे गोव्यातील पायाभूत सुविधांचा विकास झाला तसेच कार्यक्षम वीज पुरवठा कायमस्वरूपी होणार आहे.” इतर यंत्रणांनी अपूर्ण ठेवलेली कामे हाती घेण्यात आली.
या ठिकाणी नव्याने बसवले पथदीप
फोंन्तेनहास, मळा, गोवा मेरियट रिसॉर्ट जवळी भाग अशा विविध ठिकाणी जी20 बैठकांसाठी येणाऱ्या प्रतिनिधींसाठी पर्यटन व इतर कार्यक्रमांचे आयोजन होणार असल्याने या भागात निकामी झालेले पथदीप नव्याने बदलण्यात आले आहेत. उच्च न्यायालय आणि अटल सेतूखालील सचिवालय या पूर्वीचा अंधारी भागही आता प्रकाशमय झाला आहे. “तसेच जी20 उपक्रमाचा भाग म्हणून चिंबल, पाटो असे ब्लाइंड स्पॉट किंवा अपघातप्रवण समजले जाणारी ठिकाणेही प्रकाशमय करण्यात आली आहेत,” असे श्री. पाटील यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील डॉक्टर राहणार उपस्थित
जी20 परिषदेच्या आठ बैठकांचे आयोजन गोव्यात होणार आहे. दोन मंत्रिगट आणि सहा इतर बैठकांचे आयोजन एप्रिल महिन्यापासून चार महिन्यांत होणार आहे. यातील पहिली बैठक बांबोळी-गोवा येथील ग्र?ड हयातमध्ये 17 ते 19 एप्रिलदरम्यान होणार आहे. या दुसऱ्या आरोग्य सेवा कार्यगटाच्या बैठकीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील आरोग्य अधिकारी व प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
जागतिक समस्यांचे गोव्यात होणार निराकरण
जी20 गटाची स्थापना आंतरराष्ट्रीय वित्त, आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था, हवामानातील बदलांमुळे होणारे स्थलांतर आणि शाश्वत विकासाशी संबंधित असलेल्या प्रमुख जागतिक समस्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने करण्यात आली. अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, पॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, मेक्सको, कोरिया प्रजासत्ताक, दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताक, रशिया, सौदी अरेबिया, तुर्की, युनायटेड किंगडम, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि युरोपीय महासंघ (ईयु) या देशांचा समावेश जी20मध्ये आहे. अतिथी देश आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रतिनिधींनाही या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.









