गोवा राज्यातील जनतेला धर्मांतराबाबत सावध राहण्याचा सल्ला आधीच दिला होता. यानंतर १०० दिवसांच्या आत धर्मांतरावर बंदी घातली असल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant)यांनी दिली. सावंत यांच्या हस्ते एका पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी’डबल इंजिन की सरकार’च्या कामाचा आढावा घेण्यात आला आहे. ( Goa Religious conversions)
हेही वाचा- ईडीची Vivo वर करडी नजर; छापेमारीनंतर डायरेक्टर देशातून फरार
यावेळी बोलताना ते म्हणाले, 60 वर्षांपूर्वी (गोव्यातील पोर्तुगाल राजवट) आम्ही ‘देव, धर्म आणि देश’ म्हटले होते आणि याच भावनेने पुढे गेलो होतो. जर आपला देव सुरक्षित असेल तर आपला धर्म सुरक्षित असेल आणि आपला धर्म सुरक्षित असेल तर आपला देश सुरक्षित असेल असेही ते म्हणाले. ‘सरकार कधीही धर्मांतराला परवानगी देत नाही, पण तरीही मला वाटते की लोकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. गावातील मंदिर ट्रस्टने सतर्क राहण्याची गरज आहे, कुटुंबांनी सतर्क राहण्याची गरज आहे’.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









