पुण्यात मुस्लिम तऊणाने लग्नानंतर धर्म बदलाचा धरला आग्रह : अॅड. शैलेश कुलकर्णी यांच्या महत्त्वाच्या भूमिकेमुळे झाली सुटका
पणजी : ‘लव्ह जिहाद’ नावाची प्रकरणे कमी होण्याच्या ऐवजी वाढतच आहेत. अशा प्रकरणात फसणाऱ्या मुलींची सुटका फारच कमी प्रमाणात होत आहे. गोव्यातीलही असेच एक प्रकरण 4 दिवसांपूर्वी उघडकीस आले असून यात फसलेल्या तरुणीची पुण्याहून सुखऊपपणे सुटका करण्यासाठी फोंडा येथील अॅड. शैलेश कुलकर्णी यांनी सारी शक्ती पणाला लावली आणि मुलीला पुन्हा तिच्या पालकांकडे सुखऊपपणे पोहोचविण्याचे कार्य केलेले आहे. ‘लव्ह जिहाद’मध्ये फसलेली गोव्यातील ही तरुणी पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेली आहे. मुळातच हुशार आणि देखणी असलेल्या या मुलीची पुण्यातील एका कंपनीत निवड झाली. ती कामही चांगले करीत होती. पुण्यामध्ये तिची एका मुस्लिम युवकाशी ओळख झाली. ओळखीचे प्रेमात ऊपांतर झाले. आईवडिलांना कसे सांगायचे हा तरुणीसमोर प्रश्न निर्माण झाला.
इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव
दोन वर्षानंतर तिने आपल्या प्रेमाची गोष्ट घरच्यांना सांगितली आणि कायमस्वऊपी गोवा सोडला. सुऊवातीला फार प्रेमाने वागविणाऱ्या या युवकाने तिला आपल्या घरी नेले आणि नंतर त्यांचा निकाह झाला. त्यानंतर अवघ्या दोन महिन्यानंतर त्याने तिला इस्लाम धर्म स्वीकारण्याची अट घातली. तिने नकार दिल्यानंतर हळूहळू त्याने आपले दात दाखविण्यास प्रारंभ केला.
मशिदीत नेऊन केले वशिकरण
अगोदर एका मशिदीमध्ये जाऊन तिला वशिकरण करण्यात आले. त्यानंतर तिने भीतीपोटी होकार दिला. तिच्या भ्रमणध्वनीवर देवादिकांच्या प्रार्थना व इतर माहिती आलेली तिच्या नवऱ्याने पाहिली. हे सारे बंद कर, नाहीतर गाठ माझ्याशी आहे अशी तंबी देण्यास प्रारंभ केला. तिला सक्तीने काळे कपडे परिधान करण्यास भाग पाडले.
वर्षभर सोसली मारझोड, छळ
ती धर्म स्वीकारण्यास तयार नसल्याने तिच्यावर प्रत्यक्षात वार सुऊ झाले. मारझोड करण्यात आली. हे सारे तिने वर्षभर कसेबसे सहन केले. परंतु, आता सांगणार कोणाला? हा मोठा प्रश्न तिच्यासमोर निर्माण झाला.
बाबा, मला तुमची मदत हवीय
अखेरीस एक दिवस तिने आपल्या वडिलांना संदेश पाठविला. बाबा! मला तुमची मदत हवी आहे. आपण पुण्याला याल का? कोणालाच सांगू नका. आपल्याला गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागतेय. बाप या नात्याने अखेर वडिलांनी मुलीच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
अॅङ शैलेश कुलकर्णीनी गाठले पुणे
तरुणीच्या बाबांनी फोंड्यातील समाजसेवक तसेच अॅड. शैलेश कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्याकडे व्यथा मांडली असता त्यांनी या ‘लव्ह जिहाद’ प्रकरणातून मुलीची सुटका करण्यासाठी आवश्यक ती सारी मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार त्यांनी पुणे गाठले. पुण्यातील अॅड. सचिन लोखंडे यांची मदत घेतली. पुण्यामध्ये महंमदवाडी नावाचा विभाग आहे. त्याला मिनी पाकिस्तान म्हणून समजले जाते. या वाडीमध्ये जाऊन ‘लव जिहाद’मध्ये फसलेल्या तऊणीला परत आणणे हे एक फार मोठे आव्हान होते. वाघाच्या गुहेत जाण्याचाच हा प्रकार होता. दोन्ही वकिलांनी पुणे पोलिसांशी संपर्क साधला. तत्पूर्वी त्यांनी बजरंग दल आणि विश्वहिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनाही याबाबतची कल्पना दिली.
कुलकर्णी पोहोचले महंमदवाडीत
कोणत्याही परिस्थितीत भांडण तंटा, आरोप प्रत्यारोप न करता, धार्मिक तेढ न वाढविता केवळ या असहाय तरुणीची सुटका करणे हेच एकमेव उद्दिष्ट समोर ठेवून अॅड. शैलेश कुलकर्णी यांनी व्यूहरचना आखली. ज्या महमदवाडीमध्ये ती मुलगी होती त्या घरात त्यांनी प्रवेश मिळविला. काळा हिजाब घालून ती बाहेर आली. तिचा पती देखील घरात होता. सोबत पोलीस असल्याने त्याने कोणतीही गडबड केली नाही. तिला आवश्यक ते सामान बॅगेत भऊन खाली येण्यास सांगितले. पती व तिला पोलीस स्थानकावर नेले. त्या दोघांशी स्वतंत्रपणे पोलीस बोलले. सर्वांसमक्ष दोघांचीही निवेदने नोंद करुन घेतली. तऊणीने झालेला सारा प्रकार पोलिसांना व उपस्थितांना कथन केला. मुलीचे वडिल व मुलीचा भाऊही समोर होता. आपल्यावर धर्म परिवर्तनासाठी सक्ती कऊन दररोज मारहाण केली जातेय असे सांगून आपल्याला ठार करुन टाकले जाईल, अशी भीती तिने व्यक्त केली. पोलिसांच्यासमोर त्या मुस्लिम तऊणाने सर्व आरोप मान्य केले. यानंतर आपण असा कधीही वागणार नाही, आपल्याकडून चूक झाली वगैरे सांगून त्याने या तरुणीची, तिच्या वडिलांची, भावाचीदेखील माफी मागितली. मात्र मुलीने आपल्याला आता क्षणभरही थांबायचे नाही असे सांगितले. आपण स्वखुशीने परत घरी जात आहे, असे लेखी निवेदन पुणे पोलीस स्थानकावर लिहून दिले. त्यानंतर सर्वजण गोव्यात येण्यास निघाले. यासंदर्भात गोवा महिला आयोगाला आणि महाराष्ट्र महिला आयोगाला देखील कल्पना देण्यात आली आहे. अॅड. शैलेश कुलकर्णी यांनी यापूर्वी देखील अशाच पद्धतीची अनेक प्रकरणे हाताळून अनेकांना मदत केलेली आहे. महिलांच्या छळाविरोधात अनेक प्रकरणात त्यांनी गोवा महिला आयोगाच्या मदतीने महिलांना न्याय मिळवून दिलेला आहे. गोव्यातील एक मुलगी पुण्यात ‘लव्ह जिहाद’मध्ये अडकलेली तिची सुटका करण्यात त्यांनी महत्त्वाची जबाबदारी हाताळली. मुलगी चार दिवसांपूर्वीच गोव्यात पोहोचली आणि आता ती आईवडिलांबरोबर सुखी आहे.









