दुर्गादास कामत यांचा मंत्री ढवळीकरांना टोला : वाद फोंडा कदंब बसस्थानकाचा
फोंडा : गोवा फॉरवर्ड पक्ष हा केवळ सत्तेसाठी नव्हे तर जनतेसाठी काम करतो. आम्ही मतदारसंघ किंवा कार्यक्षेत्रापुरतेच न पाहत गोव्यातील समस्त जनतेच्या समस्या सरकारपर्यंत मांडून त्याचा झटपट पाठपुरावा करतो, असा टोला पक्षाचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत यांनी मंत्री सुदिन ढवळीकर यांना लगावला. फोंडा येथील कदंब बसस्थानकाच्या दुऊस्तीकामाच्या मुद्द्यावऊन मंत्री ढवळीकर यांनी गोवा फॉरवर्डवर टिका केली होती. सध्या कदंब बसस्थानकाचे दुऊस्तीकाम पूर्ण झाले असून या पार्श्वभूमिवर कामत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना हा निषाणा साधला. वर्षभर रखडत पडलेल्या फोंड्यातील कदंब बसस्थानकाचे दुऊस्तीकाम दहा दिवसांत पूर्ण न झाल्यास भर पावसात नागरिकांना घेऊन निदर्शने करण्याचा इशारा आम्ही दिला होता. तसेच हे काम झटपट मार्गी लागावे यासाठी राज्याच्या मुख्य सचिवाशी पत्रव्यवहार केला होता. दिलेल्या मुदतीत हे काम पूर्ण झाल्याबद्दल कामत यांनी कदंब महामंडळाचे अधिकारी तसेच, या कामी पाठपुरावा केल्याबद्दल फोंड्याचे आमदार व कृषीमंत्री रवी नाईक यांचे आभार मानले.
आमच्या दिल्ली भेटी जनतेच्या कामांसाठी
वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी गोवा फॉरवर्ड हा नवीन पक्ष असल्याची टिका केली होती. त्यावर उत्तर देताना कामत म्हणाले, आमचा पक्ष नवीन आहे, तरुण आहे व उत्साही आहे. त्यामुळेच गोव्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पक्षाचे नेते विजय सरदेसाई दिल्लीला जाऊन केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करतात. या उलट इतर मंत्री व आमदारांच्या दिल्ली भेटी या एकतर पक्षांतर करण्यासाठी किंवा सत्ताधारी पक्षांना पाठिंबा देण्यासाठी असतात. आमचा पक्ष हा सत्तेपेक्षा जनतेच्या हितासाठी काम करणारा पक्ष आहे. त्यामुळे येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात फोंड्यातील खराब रस्ते व इतर प्रश्नही गोवा फॉरवर्ड मांडणार आहे, असेही त्यांनी सांगितले. फोंड्यातील भूमीगत वीज वाहिन्यांसाठी खोदलेल्या रस्त्यांमुळे बऱ्याच ठिकाणी धोकादायक ख•s तसेच राहिले आहेत. मोन्सूनचा पाऊस सक्रीय होण्यापूर्वी ते बुजवून टाकण्याची मागणी पिपल ऑफ फोंडाचे प्रमोद सावंत यांनी केली. वर्षभर रेंगाळत पडलेल्या कदंब बसस्थानकाच्या दुरुस्तीकामाचा पाठपुरावा करून ते मार्गी लावल्याबद्दल गोवा फोरवर्डचे त्यांनी अभिनंदन केले.









