Goa Film Festival : 53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (IFFI) समारोप समारंभात, महोत्सवाचे ज्युरी प्रमुख नादव लॅपिड यांनी काश्मीर फाइल्सला (Kashmiri Files) स्पर्धा विभागात परवानगी दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर ( Anurag Thakur ) यांच्यासह प्रमुख मंत्र्यांच्या उपस्थितीत नदव लॅपिड (Nadav Lapid ) यांनी ही टिप्पणी केली. विवेक अग्निहोत्री ( Vivek Agnihotri) लिखित आणि दिग्दर्शित, द काश्मीर फाइल्स 1990 च्या दशकातील हिंदू आणि काश्मिरी पंडितांच्या हत्यांवर आधारित आहे.
इस्त्रायली चित्रपट निर्माते आणि इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (IFFI), गोवा चे ज्युरी प्रमुख नदाव लॅपिड यांनी विवेक अग्निहोत्रीच्या द काश्मीर फाइल्सला. “प्रपोगंडा आणि अभद्र चित्रपट” असे संबोधले. या महोत्सवात भारतीय पॅनोरमा गटासाठी काश्मीर फाइल्सची निवड करण्यात येऊन 22 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित करण्यात आला होता. या विशेष स्क्रीनिंगला या चित्ररटाचे अभिनेते अनुपम खेर उपस्थित होते.
‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने आम्हा सर्वांना व्यथित केले आहे. या चित्रपटाच्या निवडीमुळे सर्व ज्युरींना धक्का बसला आहे. अशा प्रतिष्ठित आणि आंतरराष्ट्रिय चित्रपट महोत्सवाच्या कलात्मक, स्पर्धात्मक विभागासाठी काश्मिरी फाईल्स हा प्रचारी आणि अभद्र चित्रपट वाटला.” असे लॅपिड म्हणाले.
काश्मीर फाइल्सच्या रिलीजच्या पार्श्वभूमीवर अनेक वादांना तोंड द्यावे लागले होते. अनेक समीक्षकांनी “प्रचारी चित्रपट” म्हणूनही त्याची निंदा केली. हा चित्रपट 2022 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या हिंदी चित्रपटांपैकी एक ठरला.
Previous Articleपन्नास टक्के शिक्षक भरती त्वरीत करणार; शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांचे आश्वासन
Next Article भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी पी. टी. उषा








