प्रकल्पाला अमरावती येथे द्वितीय पारितोषिक : शिरोडा रायेश्वरच्या स्पर्धेत प्रथम पारितोषिक, विद्यार्थ्यानी व्यक्त केला स्टार्टअपचा मनोदय
फोंडा : इथर,ओला ईव्ही श्रेणीतील नामांकित कंपन्याच्या ईलेक्ट्रिक स्कुटर्सची बाजारामध्ये हवा असतानाच फर्मागुडी-फोंडा येथील गोवा कॉलेज ऑफ इंजिनिअरीमधील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी आपला महाविद्यालयीन प्रकल्पाअंतर्गत ऑन द गो चार्जिग पुरविणारी ‘प्लग ईन हायब्रिड स्कूटर’ची निर्मिती यशस्वीरितया करीत या माध्यमातून स्टॉर्टअपचा मनोदय बाळगला आहे. ईव्ही म्हणजेच ईलेक्ट्रिक स्कूटरसाठी लाखो रूपये खर्च करू न शकणाऱ्यासाठी स्वस्तात मस्त पेट्रोल व ईलेक्ट्रिक एकाच वाहनात प्रस्ताव देणारे वाहन भविष्यात रस्त्यावर धावताना दिसेल असा ठाम विश्वास पाच इंजिकोने व्dयाक्त केला आहे. सद्या बाजरात उपलब्ध असलेल्या ईव्ही स्कूटर वापर करण्यामध्ये लांब पल्याच्या प्रवासासाठी चार्जिग कधी संपणार अशी धाकधुक मनात कायम असते. त्यावर उपाय म्हणून कमी प्रदूषणकारी वाहनाची निर्मिती फर्मागुडी येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकॉम्युनिकेशन विभागातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या गटाने डिझाईन केले आहे. सन्मेश रायकर, संकेत साळगावकर, तुषार नाईक, निशिका नागेशकर आणि नीतल हळदणकर यानी आपल्या अंतिम वर्षाच्या अभ्यासाचा भाग म्हणून हा प्रकल्पाच्या संकल्पनेतून निर्मिती केलेली आहे. यात त्यांना ईएनटी शाखेचे प्रमुख एच ए हिरानी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. संगम बोरकर यांच्या देखरेखेखाली हायब्रिड दुचाकीची निर्मिती केली आहे. ग्राहकांच्या पसंतीस उतरल्यास ऑटोमोबाईल क्षेत्रात नवी क्रांती ठरणार आहे. यासाठी विद्यार्थी पेटंटची नोंदणी करण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे त्यानी सांगितले आहे.
‘ऑन द गो चार्जिंग असणारी पहिली ड्यूएल स्कुटर’
हायब्रिड स्कूटरमध्ये ऑन द गो बॅटरी चार्जिगची सुविधा आहे. याव्यक्तीरीत, हायब्रीड स्कूटर पारंपारिक वाहनांपेक्षा कमी प्रमाणात प्रदुषण निर्माण करते. हायब्रीड स्कूटर बॅटरी आणि इंधनाचा अशा दोन्ही प्रकार उपलब्ध आहेत. मायलेज विचार केल्यास सुमारे 80 किलोमिटर पर्यंत बिनधास्त प्रवास करू शकते. तसेच बॅटरी 30 टक्के असताना वाहन चालता चालता चार्जिग होणार असल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केलेली आहे. प्रकल्प मार्गदर्शक प्रा. संगम बोरकर म्हणाले विद्यार्थ्यांनी केलेल्या हायब्रीड तंत्रज्ञानाच्या विकासाने उद्योग तज्ञांनी कौतुक केले आहे. ऑन द गो बॅटरी चार्जिगची गुणवत्तेबाबत संपुर्ण संशोधनात्मक काम पुर्ण झाल्यानंतरच पेट्रोल इंधनाच्या स्कुटरवर हा प्रयोग करण्यात आल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. अधिक सुटसुटीत व प्रयोगात्मक बदल करून डिजीटल मिटरसहित आर अॅन्ड डी टिम कार्यरत असल्याची माहिती त्यांनी दिली.
अमरावती येथे द्वितीय, रायेश्वर शिरोडा येथे प्रथम
अमरावती महाराष्ट्र येथे नुकत्याच 7 ते 9 एप्रिल रोजी झालेल्या सृजन दिपेक्स विद्यार्थ्यासाठी प्रकल्प स्पर्धा व राज्यस्तरिय प्रदर्शनात हायब्रिड स्कुटरच्या मॉडेलला द्वितीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. तसेच शिरोडा येथील आयटी इंजिनिअरीमध्ये झालेल्या टेक ट्स्टिर स्पर्धेत प्रथम पारितोषिक प्राप्त केले आहे.









