प्रतिनिधी /पर्वरी
तांत्रिक शिक्षण संचालनालयाने व्यावसायिक अभ्यासक्रमातील इंजीनेरिंग आणि फार्मसी पदवी प्रवेशासाठी घेतलेल्या समान प्रवेश परीक्षेचा निकाल आज तांत्रिक शिक्षण संचालक विवेक कामत यांनी जाहीर केला आहे.या परीक्षेसाठी एकून 3055 विद्यार्थी बसले होते.मागच्या वषी 2935 विद्यार्थी बसले होते. यावषी 120 विद्यार्थी जास्त बसले आहेत. सदर या परीक्षेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.व्ही एन.शेट गोवा इंजीनारिंग कॉलेज यांच्या मार्गदर्शनाखाली गोव्यातील वेगवेगळय़ा सोळा केंद्रावर ता.11 जुलै आणि ता. 12 जुलै रोजी घेण्यात आली होती.ही परीक्षा भौतिकशास्त्र, पदार्थ विज्ञान आणि गणित या विषयावर आधारित होती.आय. आय. टी मुंबई यांनीही ही परीक्षा घेण्यासाठी सहकार्य केले होत.
यंदाच्या गोवा समान प्रवेश परीक्षेच्या विषयावर आकडेवारीतील ठळक मुद्धे ः भौतिकशास्त्र विषयात एकूण 3055 मुलांपैकी 2902 विद्यार्थी परीक्षेला बसले होते.त्यात सर्वाधिक 69 गुण तर कमीत कमी 9 गुण मिळाले आहेत. सरासरी टक्केवारी 24.93 इतकी आहे.
पदार्थ विज्ञान या विषयात एकून 305 5 मुलांपैकी 2893 विद्यार्थी परीक्षेला बसले होते.त्यात सर्वाधिक 71 गुण तर कमीत कमी 11 गुण मिळाले आहेत. सरासरी टक्केवारी 26.75 इतकी आहे.
गणित विषयात एकून 2243 मुलांपैकी 2121 विद्यार्थी परीक्षेला बसले होते.त्यात सर्वाधिक 74 गुण तर कमीत कमी 7 गुण मिळाले आहेत. सरासरी टक्केवारी 26.79 इतकी आहे. यावषी गेल्या वर्षाच्या तुलनेने टक्केवारीत वाढ केली आहे.
प्रत्येक विषयातील पहिल्या पाच गुणवंत विद्यार्थ्यांची नावे खालील प्रमाणे आहेत.
भौतिकशास्त्र या विषयात ा प्रथम ःअन्व?ष संदीप बांदेकर (गुण 64 ), व्दतीय ःआदित्य प्रवीण पार्सेकर (गुण 61 ),तृतीय ःदिया दत्तराज पलंग (गुण 55 ),तृतीय ःमायकल सविओ झेवियर लेविस (गुण 55), पाचवा ः अनिष्का आनंद कुलकर्णी (गुण 52 ) पाचवा ः संजीवकुमार बाळकृष्ण नाईक (52 ) आले आहेत.
पदार्थ विज्ञान या विषयात – प्रथम ःरुजुला रमेश शेट (गुण 71), प्रथम ः आदित्य प्रवीण पार्सेकर (71 ), द्वितीय अनिष्का आनंद कुलकर्णी (गुण 69), द्वितीय ः अन्व?ष संदीप बांदेकर (गुण 69), द्वितीय ः कार्तिक उर्फ पूनम स्नेहराज प्रभुगावकर (गुण 69 ) आले आहेत.
गणित या विषयात ाप्रथम ः रोनीत नितीन कुंकळीकर (गुण 74 ), व्दतीयः कुशल जैन (गुण 73), व्दतीयः पार्थ तुषार नाईक (गुण 73), व्दतीय ः ब्रायन वाज (गुण 73), तृतीय ःमायकल सविओ झेवियर लेविस (गुण 72), संजीवकुमार बाळकृष्ण नाईक (गुण 72) आणि आर्यन प्रशांत देसाई (गुण 72) आले आहेत.
ज्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी पुढच्या आठवडय़ात प्रवेश प्रक्रिया सुरवात होईल. अशी माहिती आज या पत्रकार परिषद घेवऊन तांत्रिक शिक्षण संचालनालयाचे संचालक विवेक कामत यांनी दिल. यावेळी त्यांच्या समवेत गोवा इंजीनारिंग कॉलेज चे डॉ.व्ही एन.शेट, गोवा इंजीनारिंग कॉलेज प्राचार्य डॉ.लोहानी,डॉ. दीपक गायतोंडे आणि सहायक संचालक नीता नाईक उपस्थित होते.









