मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे उद्गार : टाटा स्टाईव्ह कौशल्य केंद्राचे फर्मागुडीत उद्घाटन
प्रतिनिधी / फोंडा
पर्यटन व आदरातिथ्य उद्योग क्षेत्रात गोव्यात जेवढ्या संधी उपलब्ध आहेत, तेवढ्या देशभरात कुठेच नाहीत. पर्यटन क्षेत्रात गोव्याचा ज्या गतीने विकास सुरू आहे, ते पाहिल्यास येणाऱ्या काळात गोवाही भारताची पर्यटन राजधानी होऊ शकते. देशी पर्यटकांसह जगभरातील पर्यटकांना आकर्षित करण्याचे आमचे उद्दिष्ट्याआहे. त्यासाठी आवश्यक साधन सुविधा निर्माण करता येतील. गरज आहे ती मनुष्यबळ निर्माण करण्याची. कौशल्य विकास कार्यक्रमातून हे साध्य करता येईल, असे उद्गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले.
फर्मागुडी येथील पीईएस शिक्षण संस्थेमध्ये टाटास्ट्राईव्ह यांच्यातर्फे सुरू करण्यात आलेल्या कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. या केंद्रातंर्गत पाच कौशल्य प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. त्यासाठी पीईएसच्या कॅम्पस मध्ये स्वतंत्र केंद्र उभारण्यात आले आहे. गुऊवारी सकाळी झालेल्या या कार्यक्रमाला कृषी मंत्री तथा पीईए ससंस्थेचे अध्यक्ष रवी नाईक, फोंड्याचे नगराध्यक्ष तथा पीईएसचे सचिव रितेश नाईक, वेलिंग प्रियोळ पंचायतीच्या सरपंच हर्षा गावडे व टाटा स्ट्राईव्हच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता राजन हे व्यासपीठावर उपस्थित होते.
कौशल्य विकासातून आवडीच्या क्षेत्रात नोकरीच्या संधी
युनेस्कोने यंदाचे वर्ष हे कौशल्य वर्ष म्हणून जाहीर केले आहे. नवभारताच्या निर्माणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौशल्य विकासावरअधिक भर देत विविध क्षेत्रात असे उपक्रम सुऊ केले आहेत. राज्य सरकार नेही त्या दृष्टीने पावलेटाकीत खासगी क्षेत्राशी करार केला आहे. येत्या 15 जुलैपर्यंत दहा हजार उमेदवारांना या कौशल्य विकास कार्यक्रमात सहभागीकरून घेण्याचे आमचे उद्दिष्ट्या आहे, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले. पारंपरिक शिक्षण पद्धतीतून पदवीधरांना आपल्या आवडीच्या किंवा त्यांनी निवडलेल्या क्षेत्रात नोकऱ्या मिळतीलच याची शाश्वती नाही. मात्र कौशल्य प्रशिक्षणातून आपल्या आवडीचे क्षेत्र निवडतानाच त्याच क्षेत्रात रोजगाराची हमी निश्चितच आहे, असे त्यांनी नमूद केले. खासगी क्षेत्रात आजभर पूरसंधी असून त्यासाठी कौशल्य विकास उपक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.
टाटा ट्राईव्ह तर्फे कौशल्य विकास केंद्रासाठी पीईएस शिक्षण संस्थेची निवड केल्याबद्दल रितेश नाईक यांनी आनंद व्यक्त केला. शिक्षण क्षेत्रात सतत नवनवीन देण्याचा आमच्या संस्थेचा प्रयत्न आहे. या कौशल्य प्रशिक्षणातून आवडीची शाखा निवडतानाच केवळ गोव्यातच नव्हेतर देशभरात नोकरीच्या संधी असल्याचे त्यांनी सांगितले.
टाटातर्फे देशभरात दीडशे कौशल्य केंद्रे
अनिता राजन यांनी टाटा स्ट्राईव्ह कौशल्य उपक्रमांविषयी माहिती देताना देशातील युवकांच्या चांगल्या भवितव्यासाठी सुरू केलेला हा राष्ट्रीय कार्यक्रम असल्याचे सांगितले. देशभरात अशी दीडशे कौशल्य केंद्रे सुऊ आहेत. पीईएसमधील केंद्रातून पाच प्रकारचे कौशल्य अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. त्याचा गोव्यातील तरूणांना फायदा होणारआहे. या केंद्रातून केवळ रोजगार कौशल्यच नव्हेतर जीवन कौशल्यही विकसित करण्याचे ध्येय असल्याचे सांगून पीईएस संस्थेने उत्कृष्ट केंद्र उभारल्याबद्दल त्यांनी संस्थेचे अभिनंदन केले.
पाच अभ्यासक्रम, मोफत प्रवेश
टाटा ट्राईव्हच्या या कौशल्य केंद्रातंर्गत उद्योग व सेवा क्षेत्रात रोजगार कौशल्य निर्माण केली जातात. फर्मागुडीच्या या केंद्रात आरोग्यसेवा, आदरातिथ्य, आयटी सर्व्हीसेस, इलेक्ट्रिकल तंत्रज्ञानआणि एसी तंत्रज्ञान हे पाच अभ्यासक्रम सुऊ करण्यात आले आहेत. तीन ते चार महिन्यांचे हे प्रशिक्षण मोफत असून प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर विविध खासगी उद्योग क्षेत्रात कॅम्पस मुलाखतीच्या माध्यमातून नोकरीच्या संधी दिल्या जात आहेत. फर्मागुडी येथील या केंद्रात वर्षभरात चारशे उमेदवारांना प्रशिक्षण देण्याची सोय करण्यात आली आहे. या उपक्रमाला टाटा उद्योगासह क्रॉम्प्टन, एचडीएफसी बँक अशा आर्थिक व उद्योग क्षेत्रातील कंपन्यांचे सहकार्य लाभत आहे.









