बेळगाव : बेळगाव शहराच्या भोवती रिंगरोडसाठी प्रशासनाने नोटीफिकेशन जारी करत 16 गावांमधील शेकडो एकर जमीन संपादन करण्याचा घाट घातला आहे. दरम्यान या रिंगरोड विरोधात रणनिती आखण्यासाठी आज कॉलेज रोडवरील म. ए. समितीच्या कार्यालयात बैठक पार पडली.
दरम्यान या बैठकीला उपस्थित शेतकर्यांनी आपली एक इंचही जागा देणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला. यासाठी आपण उच्च न्यायालयात धाव घेऊन, मात्र कोणत्याही परिस्थितीत जमीन देणार नसल्याचे शेतकर्यांनी सांगितले. यावेळी ऍड. एम. जी. पाटील यांनी रिंगरोड विरोधात न्यायालयातून कशा प्रकारे लढात देता येईल याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी उच्च न्यायालयात गेल्यास याला निश्चितच स्थगिती मिळेल, अशी माहिती दिली.
बैठकीला ऍड. शाम पाटील, ऍड राजभाऊ पाटील, लक्ष्मण होणगेकर, रामचंद्र मोदगेकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.