मुंबई :
गो फॅशन कंपनीचा समभाग सोमवारी शेअरबाजारात घसरणीत असताना दिसला. समभागाचा भाव 5 टक्के इतका बीएसईवर घसरत 1133 रुपयांवर खाली आला होता. सेक्वोला कॅपिटल आगामी काळात कंपनीतील आपला 10 टक्के इतका हिस्सा विकणार असल्याची बातमी असून त्याचा परिणाम समभागावर नकारात्मक दिसला आहे. सदरचा हिस्सा विक्रीचा व्यवहार 625 कोटी रुपयांना होणार असल्याचे समजते. कंपनीचे समभाग एक महिन्यात 8 टक्के इतके वाढले असून वर्षभरात 21 टक्के वाढले आहेत.









