प्रतिनिधी / सिंधुदुर्ग
Glory to the carrom players of Sindhudurg who performed remarkably at the national level!
सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशन चे प्रतिनिधीत्व करत राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या सिंधुदुर्गतील कॅरमपटूंचे नुकतेच आमदार नितेश राणे आणि जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी विशेष कौतूक करुन अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छाही दिल्या.अतिशय कमी वयात थेट राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील नामवंत खेळाडूंना पराभूत करणाऱ्या सिंधुदुर्गातील या खेळाडूंमध्ये कु. केशर निर्गुण, कु. मयुरी गावडे, कु. प्रणिता आयरे आणि अमुल्य घाडी यांचा सामावेश आहे. या खेळाडूंपैकी कु. केशर निर्गुण हीने नॅशनल ज्युनियर कॅरम स्पर्धेत कात्स्य पदक तर नॅशनल फेडरेशन स्पर्धेत सिनियर गटात डबल्स मधून कात्स्य पदक पटकावलं. सध्या ती महाराष्ट्राची अव्वल सीडेड खेळाडू म्हणून ओळखली जाते. कु. मयुरी तावडे हीने महाराष्ट्र राज्य ज्युनियर कॅरम स्पर्धेत कात्स्य पदक पटकावलं असून तिनेही सिनियर नॅशनल स्पर्धेपर्यंत धडक मारली आहे. कु. प्रणीता आयरे हीने राज्यस्तरीय आंतर शालेय कॅरम स्पर्धेत रौप्य पदक मिळवलं असून, तिनेही सिनियर नॅशनल स्पर्धेमध्ये धडक मारली आहे.

अमुल्य घाडी याने राज्यस्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत सुवर्णपदक तर असोसिएशन स्पर्धेत चौथा क्रमांक पटकावला आहे.कॅरम या क्रीडाप्रकारात धमाकेदार कामगिरी बजावत सिंधुदुर्ग जिल्ह्याला विशेष लौकीक प्राप्त करुन देणाऱ्या या चारही खेळाडूंनी व त्यांचे प्रशिक्षक आणि सिंधुदुर्ग कॅरम असो. चे सचिव योगेश फणसळकर यांनी जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांची भेट घेतली. श्री. मंजूलक्ष्मी यांनी त्यांच्या कामगिरीचे कौतूक तर केलेच, पण त्याच बरोबर त्यांना सरावासाठी आवश्यक असलेल्या गोष्टीही जाणून घेतल्या आणि सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छाही दिल्या.आ. नितेश राणे यांनी देखील या चारही खेळाडूंना व त्यांच्या प्रशिश्नकांना जिल्हा बँकेत बोलावून घेत, त्यांची पाठ थोपटली व पुढील वाटचालीस शुभेच्छाही दिल्या, यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी, प्रभाकर सावंत व संचालक प्रकाश मोर्ये उपस्थित होते.









