दर सेकंदाला गायब होतेय लाखो लीटर पाणी
अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात एक सरोवर लोकांसाठी चर्चेचा विषय ठरले आहे. या सरोवरात एक 72 फूट रुंद विशालकाय छिद्र असून याला काही लोक ग्लोरी होल देखील म्हणतात. याला नरकाचा दरवाजा देखील म्हटले जाते. कॅलिफोर्नियाच्या पूर्व नापा व्हॅली येथे हे सरोवर असून त्याचे नाव बेरीसा आहे. या सरोवरात पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात वाढल्याने 72 फूट रुंद एक भुयार तयार झाले आहे हे भुयार नाल्याचे काम करत असून यामुळे सरोवरातील अतिरिक्त पाणी बाहेर पडत आहे.
प्रत्यक्षात बेरीसा सरोवर नैसर्गिक नसून ते मानवनिर्मित आहे आणि याच्या आतच नरकाचा दरवाजा आहे. हा दरवाजा फारच कमी वेळा उघडला जातो. बेरीसा सरोवरात तयार भुयारात पाणी चक्राकार फिरून विचित्र प्रकारे बाहेर पडते, जे पाहून माणसाचे डोकेच चक्रावून जाते. सरोवरात तयार हे भुयार एखाद्या ख•dयाप्रमाणे दिसून येते. या सरोवरात जेव्हा अधिक पाणी जमा होते, तेव्हा अतिरिक्त पाणी या विशाल छिद्रातून बाहेर पडते. एखाद्या भोवऱ्याप्रमाणे अद्भूत दिसते. मोंटीसेला डॅमवर या सरोवराची निर्मिती करण्यात आली आहे.
या जलाशयात 5.2 कोटी गॅलन्स पाणी जमा केले जाऊ शकते. हे दृश्य पहिल्यांदाच पाहिले आहे असे नाही. 1950 च्या दशकात इंजिनियर्सनी एक अद्भूत संरचना तयार केली, यामुळे सरोवरात हे दृश्य दिसून येते. कॅलिफोर्नियाचा पर्वतीय भाग नापा काउंटीमध्ये माणसांकडून निर्मित हे सातव्या क्रमांकाचे मोठे सरोवर आहे. या काँक्रिट धरणाची उंची सुमारे 304 फूट असल्याने हे सरोवर तयार झाले आहे. 1953 ते 1957 दरम्यान हे सरोवर तयार करण्यात आले. यादरम्यान इंजिनियर्सनी ग्लोरी होलला अतिरिक्त पाणी बाहेर काढण्यासाठी निर्माण पेले होते. या 72 फूट रुंद ग्लोरी होलला पाणीपातळीने धोक्याचा स्तर गाठल्यावर खोलले जाते. सरोवरातून अतिरिक्त पाणी बाहेर काढण्यासाठी हे खुले केले जाते. सरोवराची पाणीपातळी 4.7 मीटरपेक्षा अधिक झाल्यावर हे खुले केले जाते.
दर सेकंदाला 1360 क्यूबिक पाण्याचा विसर्ग
या सरोवराच्या पाणीपातळीने 4.7 मीटरचा स्तर ओलांडल्यावर ग्लोरी होलमधून दर सेकंदाला 1360 क्यूबिक मीटर पाणी बाहेर सोडले जाते. हे पाणी येथून दुसऱ्या स्थानी पोहोचते. हे दृश्य पाहण्यासाठी येथे लोक मोठी गर्दी करत असतात. 1997 मध्ये हे दृश्य पाहण्यासाठी एक महिला याच्या नजीक पोहोचली आणि चक्रावून गेल्याने ख•dयात सामावली. तेव्हापासून याच्या नजीक जाण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या ग्लोरी होलला यापूर्वी 2019 मध्ये खुले करण्यात आले होते. सरोवराचे पाणी कमी झाल्यावर ग्लोरी होल बंद करण्यात येतो.









