Global Gold Star Award given to Dr. Chandrakant Sawant
ओवळीये गावचे सुपुत्र आंबोली निवासी तथा मठ प्राथमिक शाळा नं. २ चे पदवीधर शिक्षक चंद्रकांत तुकाराम सावंत यांनी गेल्या दोन दशकात समाज हितासाठी लाखो रुपये खर्च करून केलेल्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कार्याची मुंबई येथील ग्लोबल गोल्ड टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्डने दखल घेतली असून त्यांना ग्लोबल गोल्ड स्टार अवॉर्ड २०२२ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
डॉ चंद्रकांत सावंत यानी सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेंतर्गत जिल्ह्यातील प्राथमिक व उच्च प्राथमिक अशा ७० शाळांमधील ९५ विद्यार्थीनी आणि ५ माघ्यमिक हायस्कूल मधील २५ विद्यार्थीनी मिळून एकत्रित ७५ शाळांमधील १२० विद्यार्थीनी कायमस्वरूपी दत्तक घेत तीन लाख ७७ हजार रुपये कायमस्वरूपी देणगी दिली. या देणगीच्या व्याजातून दरवर्षी त्या त्या शाळेतील एकूण १२० मुलींचा कायमस्वरुपी शैक्षणिक खर्च करण्यात येणार आहे.
ओटवणे प्रतिनिधी









